• Mon. Nov 25th, 2024
    सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, NCPच्या आमदार बैठकीमध्ये मोठा निर्णय, अजित पवारांची…

    Ajit Pawar Elected as NCP Group Leader: प्रत्येक पक्षामध्ये मग तो शिवसेना, भाजप किंवा राष्ट्रवादी असेल बैठकांचा सिलसिला सुरु झालेला आहे. त्यातच अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे.

    हायलाइट्स:

    • सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
    • NCPच्या आमदार बैठकीमध्ये मोठा निर्णय
    • अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
    महाराष्ट्र टाइम्स.कॉम
    अजित पवार राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

    मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काल समोर आला आहे. या निकालाची कुणालाही अपेक्षा नव्हती. कारण महायुतीला या निवडणुकीत २२० पेक्षा जास्त जागांवर यश मिळालं आहे. महाविकास आघाडीचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाला देखील चांगलं यश मिळालं आहे. अजित पवार गटाने या निवडणुकीत केवळ ५३ ठिकाणी उमेदवार दिले होते. त्यापैकी तब्बल ४१ जागांवर अजित पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांच्या उमेदवारांचा तब्बल ४० ठिकाणी सामना झाला. त्याचदरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सरकार स्थापनेच्या हालचालींना आता वेग आलेला आहे.प्रत्येक पक्षामध्ये मग तो शिवसेना, भाजप किंवा राष्ट्रवादी असेल बैठकांचा सिलसिला सुरु झालेला आहे. त्यातच अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे. विधानसभेमघ्ये देखील बहुमत सिद्ध करण्यासाठी बहुमत चाचणी होईल. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना महत्त्व प्राप्त होतंय. काल निकाल लागला आणि महायुतीला भरघोस असं यश मिळालेलं आहे. त्यानंतर देवगिरी बंगल्यावरच्या बैठकीत अजितदादांची गटनेतेपदी निवड झाली आहे. सगळ्या आमदारांची बैठक पार पडली आणि या बैठकीत सर्वानुमते अजितदादांची गटनेतेपदी निवड करण्यात आली.
    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed