Jalna Eknath Shinde Shivsena Arjun Khotakr vs Congress Kailash Gorantyal Vidhan Sabha Election 2024 Result: आजसुद्धा हीच परिस्थिती असली तरी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांमध्ये काहीशी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
हायलाइट्स:
- जालना मतदारसंघात कोणाची ताकद
- महायुती जिंकणार की मविआ मारणार बाजी?
- पक्षांमध्ये काहीशी रस्सीखेच पाहायला मिळणार
अर्जुन पंडितराव खोतकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील भारतीय राजकारणी आहेत. शिवसेनेचे सदस्य म्हणून ते मराठवाड्यातील जालन्यातून निवडून आलेले आमदार आहेत.
Kolhapur: कोल्हापुरात निकालापूर्वीच समरजीतसिंह घाटगेंच्या विजयाचे पोस्टर, तर शाहूवाडीत विनय कोरेंचं बॅनर
शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून शिंदे गटात सहभागी झालेल्या अर्जुन खोतकर जालना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा मोठा चेहरा आहेत. अपेक्षेप्रमाणे शिंदे यांच्या शिवसेनेने खोतकर यांना उमेदवारी जाहीर केली आणि तिकीट दिलं. या जागेसाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे तसेच भाजप नेते अशोक पांगारकर हे भाजपकडून इच्छुक होते. त्यातच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची माजी आमदार अरविंद चव्हाण देखील, या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते.

