• Mon. Nov 25th, 2024

    ‘मुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्या दिवसापासून ठरलंय की…’; निकाल लागताच देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान काय?

    ‘मुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्या दिवसापासून ठरलंय की…’; निकाल लागताच देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान काय?

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २०० हून अधिक जागांवर विजय मिळवत मोठी आघाडी घेतली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले. मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता जवळपास सर्वा चित्र स्पष्ट झाले. २०१४ पेक्षा मोठी लाट महाराष्ट्रात यंदा आल्याची दिसली. महायुतीच्या बाजूने जनतेने आपला कौल दिला. तब्बल २०० पेक्षा जास्त जागांवर महायुतीने विजय मिळवला असून महाविकास आघाडीचा पराभव केला आहे. महायुती सरकार आल्यावर आता मुख्यमंत्री कोण असणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकटच्या भाजपच्या जवळपास १०० पेक्षा जास्त जागा आल्या असल्याने देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित मानलं जातंय. आता निकाल लागल्यावर पत्रकार परिषदेमध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे.

    अमित शहांनी मुख्यमंत्रिपदबाबत पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, तिन्ह पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील. यासंदर्भात कोणताही वाद-विवाद नाही. पहिल्या दिवसापासून हे ठरलं आहे की, निकालानंतर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन हे ठरवतील. त्या बैठकीत जो काही निर्णय होईल तो आम्हाला सर्वाना मान्य असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    आता खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेंच्या सेनेला लोकांनी स्वीकारलं आहे. जेव्हा वारंवार एका व्यक्तीला किंवा पक्षाला टार्गेट करता तेव्हा त्याच्यातील तीव्रता कमी होते. लोकांना काही दिवसांनी त्यांचं सत्य समजतं. जनतेनमध्येसहानूभुती तयार होते, तसंच मविआने आम्हाला टार्गेट केलं पण लोकांनी आमचे ट्रॅक रेकॉर्ड पाहून मतदान केल्याचं फडणवीस म्हणाले.

    महाराष्ट्राच्या जनतेपुढे आमचे साष्टांग दंडवत आहे. विषारी प्रचाराला जनतेने कृतीतून उत्तर दिलं होतं. आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, चक्रव्यूव्ह तोडून दाखवू आणि ते चक्रव्यूव्ह तोडून टाकलं आहे. लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे. त्यामुळे विरोधी पक्षात निवडून आलेल्या लोकांचा आम्ही सन्मान करू, त्यांचा आवाज छोटा असू की मोठा आवाज असू ते ज्या योग्य गोष्टी असतील त्यावर त्यांनी आम्ही योग्य प्रतिसाद देऊ, असंही फडणवीसांनी सांगितलं.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed