08:32 AM, Nov 23 2024
ठाकरे गटाचे राजन तेली सावंतवाडी येथून आघाडीवर
08:29 AM, Nov 23 2024
चिपळूण येथून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे शिखर निकम आघागाडीवर
08:28 AM, Nov 23 2024
कणकवली मतदारसंघातून नितेश राणे यांची आघाडी
08:09 AM, Nov 23 2024
कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदेंसमोर दिघेंच्या पुतण्याचे आव्हान आहे
08:08 AM, Nov 23 2024
एकनाथ शिंदेंना पोस्टल मतमोजणीत आघाडी मिळाली आहे
08:07 AM, Nov 23 2024
कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून सुरुवातीच्या कलानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत
07:55 AM, Nov 23 2024
47 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघासाठी आय टी आय, वर्कशॉप -1, वागळे इस्टेट, ठाणे येथे मतमोजणी होणार आहे.
07:55 AM, Nov 23 2024
ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात एकूण मतमोजणीच्या 24 फेऱ्या होणार आहेत.
07:21 AM, Nov 23 2024
ठाण्यात थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार
07:12 AM, Nov 23 2024
ठाण्याच्या जागेवर भाजपचे संजय केळकर आणि शिवसेनेचे (उद्धव गट) राजन विचारे यांच्यात चुरशीची लढत आहे.
07:09 AM, Nov 23 2024
कोपरी-पाचपाखाडीत मुख्यमंत्री शिंदेंना केदार दिघे यांचे आव्हान
07:08 AM, Nov 23 2024
कोकणातील १५ मतदारसंघांसाठी १२८ उमेदवार निवडणूक रिंगणात
06:33 AM, Nov 23 2024
दिड तासांनी मतमोजणीला सुरुवात होईल.
06:11 AM, Nov 23 2024
ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, उल्हासनगर, ऐरोली, ओवळा-माजिवडा, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे शहर, डोंबिवली, बेलापूर, भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, मीरा-भाईंदर, मुंब्रा-कळवा, मुरबाड आणि शहापूर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
06:10 AM, Nov 23 2024
आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल
06:10 AM, Nov 23 2024
कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून याआधी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयी पताका फडकावली आहे
06:09 AM, Nov 23 2024
ठाणे शहरातून भाजपचे संजय केळकर विद्यमान आमदार आहेत
06:08 AM, Nov 23 2024
ठाणे जिल्ह्यातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघांचा निकालही आज समोर येईल.
06:08 AM, Nov 23 2024
आज विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यावर राज्यात कोणाचं सरकार येईल, हे स्पष्ट होणार.
06:07 AM, Nov 23 2024