08:02 AM, Nov 23 2024
राज्याचे लक्ष लागून असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस आघाडीवर
07:55 AM, Nov 23 2024
अकोल्यात स्ट्राँग रूम उघडले, काही वेळात मतमोजणीला होणार सुरवात
07:31 AM, Nov 23 2024
राज्यातील मतदानाची टक्केवारी
07:17 AM, Nov 23 2024
माओवाद्यांची दहशत झुगारून गडचिरोली जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. सिरकोंडा या गावात दुपारी १ वाजतापर्यंत ८५ टक्के मतदान झाले होते.
07:10 AM, Nov 23 2024
या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या सभा गाजल्या. या सभांमधील कुठल्या मुद्द्यावर मतदारांचा प्रतिसाद मिळतो हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
07:10 AM, Nov 23 2024
विदर्भाच्या ६२ मतदारसंघांत कुणाला अधिक जागा मिळतात यावर सारं काही अवलंबून राहणार आहे. या मतदारसंघांमध्ये १ हजार ५२२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तरीही मुख्य लढत महाविकास आघाडी, महायुतीमध्ये झाली आहे.
06:54 AM, Nov 23 2024
निवडणुकीत सोयाबीनचे कोसळलेल्या दरावरून विरोधकांनी वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला. यावर तोड म्हणून महायुतीने सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर देणार असल्याचे जाहीर केलं होतं.
06:53 AM, Nov 23 2024
पूर्व विदर्भातील ३२ मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या दिग्गजांचे मतदारसंघ असल्यानं हा भाग कुणाला साथ देतो याकडं लक्ष लागलं आहे.
06:48 AM, Nov 23 2024
दिग्गज नेत्यांच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष
06:47 AM, Nov 23 2024
२०१९च्या तुलनेत विदर्भातल्या ४२ मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला, धक्का कोणाला?
06:46 AM, Nov 23 2024
महायुती की महाविकासआघाडी? जनतेचा कौल कोणाला?
06:45 AM, Nov 23 2024
विदर्भात एकूण ६२ मतदारसंघ आहेत.
06:45 AM, Nov 23 2024