Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live in Marathi : विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरू होईल. या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. मराठवाड्यामध्ये राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रमुख लढत बघायला मिळतंय. अशोक चव्हाण यांची लेक या निवडणुकीच्या मैदानात आहे तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांचीही लेक ही निवडणूक लढत आहे. धनंजय मुंडे यांच्यापुढेही मोठे आव्हान आहे. लातूरमध्येही यंदा बाल्लेकिल्ला राखणे देशमुखांसाठी महत्वाचे आहे. परभणीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे राहुल पाटील हे मैदानात आहेत.
मराठा आंदोलनाचा फटका मराठवाड्यात बसणार कोणाला?
