• Tue. Nov 19th, 2024

    पुण्यात बाजी पलटणार! ‘कसब्यात मराठा उमेदवार ओळखा’, मनोज जरांगेंच्या बॅनर्सने वातावरण फिरणार?

    पुण्यात बाजी पलटणार! ‘कसब्यात मराठा उमेदवार ओळखा’, मनोज जरांगेंच्या बॅनर्सने वातावरण फिरणार?

    Pune kasaba Peth : पुण्यातील विधानसभा निवडणुकीमधील लक्षवेधी असणाऱ्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे कसबा पेठ. या मतदारसंघामध्ये आता मनोज जरांगे यांचे एक पोस्टर झळकत आहे. ज्यामुळे निवडणूर फिरण्याची शक्यता मानली जात आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : उद्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. काल रात्री प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता मतदारराजा आपले मत मतपेटीत बंद करणार आहे. मात्र मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असतानाच पुण्यातील हाय व्होल्टेज असणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच पेटल्याचं पाहायला मिळत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात काल रात्री मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असणारे बॅनर झळकल्याने राजकीय वातावरण चांगलंच गरम झाल आहे.

    कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर भाजपकडून हेमंत रासने मनसेचे गणेश भोकरे आणि काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार कमल व्यवहारे हे उमेदवार रिंगणात आहेत. मोठी चुरचशी लढाई असणाऱ्या कसब्यात काल मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असणारे पोस्टर झळकले आहेत. ‘कसब्यात मराठा उमेदवार ओळखा, एक मराठा लाख मराठा’च्या घोषणेसह जरांगे पाटलांचा फोटो असणारे हे पोस्टर अनेक चौकांमध्ये लावण्यात आले आहेत.
    ‘पैसे वाटणाऱ्यांना मार पडणार’, नारायण राणेंच्या टीकेला नाईकांचा प्रत्युत्तर, आपण दोघेही रात्री…
    कसब्यात प्रमुख लढत असणारे काँग्रेस, भाजप, मनसेकडून लढणारे तिन्ही उमेदवार हे ओबीसी असून अपक्ष लढणाऱ्या कमल व्यवहारे या एकमेव मराठा समाजातील आहेत. त्यामुळे व्यवहारे यांच्या समर्थनार्थ हे बॅनर्स लावण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मतदानाला अवघे काही तास उरले असताना लागलेल्या या बॅनर्समुळे मात्र राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.
    अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर पोलीस स्टेशन बाहेर गोंधळ, तर सहानुभूतीसाठी स्टंट असल्याचा भाजपचा आरोप
    काल संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून सर्वच उमेदवारांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता कसबा मतदारसंघात एक मराठा लाख मराठाच्या घोषणेचा लागलेल्या बॅनर्समुळे राजकारण वातावरण तापताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत उमेदवार उभे करणार नसल्याचे सांगितलं होतं. मात्र कोणत्या मतदारसंघात कुणाला पाडायचं आणि कुणाला आणायचं हे समाजाने ठरवावे, असा सल्ला देखील दिला होता. त्यामुळे कसब्यात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात लागलेल्या या बॅनरसाठी चर्चा संपूर्ण पुणे शहरात रंगली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed