Maharashtra Election 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच दिवशी कोकणात ३ सभा घेतल्या. शिंदे यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका देखील केली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आड काळ्या सापासारखी आडवी येणारे सावत्र भाऊ असा उल्लेख करत महाविकास आघाडीचे नेत्यांवर मुख्यमंत्र्यांनी तोंडसुख घेतले. आता याच नेत्यांनी तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली हे पैसे आभाळातून पडणार का? असाही खडा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला आहे. इतकेच नाही तर या सभांमधून भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे,शिवसेना नेते रामदास कदम, खासदार सुनील तटकरे, उदय सामंत, भाजपाचे माजी आमदार विनय नातू ,आरपीआय बळीराज संघटना आदी घटक पक्षांचे सगळे नेते शनिवारी झालेल्या या सभांमधून मुख्यमंत्र्यांबरोबर दिसल्याने महायुतीच्या या नेत्यांनी हम सब एक है असाच संदेश देण्याचा प्रयत्न निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या सभांमधून केल्याच दिसत आहे.
स्वार्थासाठी,सत्तेत येण्यासाठी आमची फसवणुक केली; शरद पवारांकडून जाहीर सभेत तटकरेंचा समाचार
कोकण विकास प्राधिकरण बळकट करण्याबरोबरच कोकणाचा बॅकलॉग भरून काढण्याची हमी देत आंबा काजू बागायतदारांना आश्वस्त केले आहे. रामदास कळविणे लावून धरलेल्या कोकणात कोयनेच फुकट जाणारे 67 टीएमसी पाणी या विषयाचे उल्लेख करत हे फुकट जाणारे पाणी कोकणात वापरात आणले जाईल अडवल जाईल. यासाठी केंद्र शासनाने मान्यता दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. त्यामुळे हे पाणी जर का खरंच वापरात आल्यास कोकणातील पाणी प्रश्न व शेती बागायतीला मोठे वरदान मिळणार आहे. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा जोरदार समाचार घेत भावनिक आवाहन केले आहे.
जीवनावश्यक पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याची घोषणा
बाळासाहेबांच्या युतीच्या सरकारने १९९५ साली आदल्या सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थिर ठेवले होते तसेच भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणात गुहागर येथील सभेत बोलताना केली आहे. आणि लाडक्या भावांनी बहिणींनी एकच काम सांगा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून आलोय आणि जे म्हणतात ही योजना बंद करणार त्यांना सांगा कोणी माई का लाल आला तरी ही योजना बंद होऊ देणार नाही, असा सज्ज इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे.
तुम्ही महाराष्ट्रातील सरकार पैशांच्या जोरावर चोरले; प्रियांका गांधींचा कोल्हापुरातून थेट PM मोदींवर हल्ला
पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही
लाडक्या बहीण योजने संदर्भात आणि चौकशी करू आत मध्ये टाकू एकनाथ शिंदेला आत मध्ये टाकू अरे धमक्या कोणाला देता हा एकनाथ शिंदे आंदोलन करत मोठा झाला आहे. संघर्षातून पुढे आलाय जेल भोगून पुढे आलाय तुमच्या अशा या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावला आहे. तुम्ही मला हलक्यामध्ये घेऊ नका हलक्यामध्ये घेतलं म्हणून तुमच्या टांगा पलटी करून टाकला सरकार बदललं आणि म्हणून आमच्या सामान्य जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणले.
हे सरकार ‘देना बँक है लेना बँक नही ‘
सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले सरकार बदलले म्हणून आम्ही अनेक लोकाभिमुख योजना सुरू करू शकलो असे म्हणत आमचा हा आता वचननामा आहे तो दाखवत दाखवत मुख्यमंत्री म्हणाले की, ‘ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’ असं म्हणत हे सरकार देणार आहे घेणार नाही ही ‘देना बँक लेना बँक नही ‘ आशा शब्दात विरोधकांचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला आहे. अशी घोषणाच कोकणातील सभेत केली आहे.
मकरंद पाटलांना आज झोप लागणार नाही, भर सभेत शरद पवारांनी काहीच शिल्लक ठेवले नाही; शेवटी गावचा सरपंच…
शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुतीच्या उमेदवारासाठी दापोलीत योगेश कदम गुहागर मध्ये राजेश बेंडल, रत्नागिरी येथील उमेदवार उदय सामंत, राजापूर येथे किरण सामंत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी याचे मंत्री दीपक केसरकर व कुडाळ मधून निलेश राणे यांच्यासाठी प्रचार सभा घेण्यात आल्या. शिवसेना भाजपा राष्ट्रवादी या तिन्ही महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. लोकसभेला कोकणाने आघाडीला स्थान दिले नाही याबद्दल कोकणवासियांच त्यांनी विशेष कौतुक केले. त्यामुळे कोकणात विधानसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांनी उपस्थिती पाहता बाजी मारल्याचा अंदाज येथील राजकीय विश्लेषकांकडूनही ही व्यक्त होत आहे
बेंडल यांचा विजय नातूंची विधानपरिषदेवर वर्णी?
यावेळी मुख्यमंत्र्यांनी गुहागर मधूनही कुणबी समाजाचे एकमेव असलेले उमेदवार राजेश बेंड यांच्या कौतुक करत नातू साहेब तुमच्यामुळे राजेश नगराध्यक्ष झाला आता आमदार करा असं थेट व्यासपीठावरून सांगताच भाजपाचे माजी आमदार विनय नातू यांनीही उठून मुख्यमंत्र्यांना खळखळून हसत प्रतिसाद दिला. त्यामुळे राजेश बेंडल यांचा विजय हा नातूंसाठीही महत्त्वाचा मानला जात आहे. यास गुहागर मतदारसंघात नातूंचे वडील तात्यासाहेब नातू तब्बल चार वेळा आमदार होते. विनय नातू स्वतः तब्बल तीन वेळा आमदार राहिले आहेत. भाजपाचे माजी आमदार विनय नातू यांची विधान परिषदेवरती वर्णी लागण्याचे संकेत मिळाले आहेत.
2009 सालचा माझा पराभव उद्धव ठाकरेंमुळे
रामदास कदम यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मी आज शपथ घेतो आता इथून पुढे आपल्यात वाद होणार नाहीत असे सांगत 2009 साली माझा गुहागर मतदारसंघातून झालेला पराभव नातू यांनी नाही तर उद्धव ठाकरे यांनीच केला होता असं सांगत महायुतीमध्ये आता दुधात अधिकाधिक साखर पडेल असे सांगत वाद मिटल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तर याचवेळी व्यासपीठावरती माजी आमदार सूर्यकांत दळवी हेही उपस्थित असल्याने आता दळवी कदम हा वादही म्हटल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या तीनही सभांमधून कोकणात वारे फिरले आहे.