Devendra Fadnavis: महाविकास आघाडी पडल्यानंतर कोणाच्या ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं.
एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायचं आहे, त्याची कल्पना मला पहिल्या दिवसापासूनच होती, असं फडणवीस म्हणाले. ‘उद्धव ठाकरेंसोबत जे घडलं ते सत्तेसाठी नव्हतं, हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं. शिंदेंना मुख्यमंत्री करायचं हे ठरलं होतं. या सरकारमध्ये मी सहभागी होणार नाही, हे मी पक्षाला सांगितलं होतं. मी त्या सरकारमध्ये गेलो तर लोक विचार करतील, हा माणसाच्या मनात सत्तेची लालसा आहे. ५ वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतरसुद्धा आता कोणत्याही पदावर जाण्यास हा तयार आहे. त्यामुळे मला सरकारमध्ये सहभागी व्हायचं नाही. पक्षाला मी माझ्या भावना कळवलेल्या होत्या,’ असं फडणवीस म्हणाले.
BJP Internal Survey: महायुतीत अजित पवारांना फटका, शिंदे ‘पॉवर’ राखणार; भाजपचा सर्व्हे काय सांगतो? आकडेवारी समोर
‘माझ्या भावना पक्षाला पटल्या होत्या. पण नंतर शपथविधी सोहळ्याची वेळ आल्यावर माझ्या नेत्यांनी मला सरकारमध्ये सामील होण्याच्या सूचना केल्या. राज्यातील परिस्थिती पाहता हे सरकार अतिशय नाजूक आहे. त्यामुळे सरकारमध्ये अनुभवी व्यक्तीची गरज आहे. यासाठी तुम्ही सरकारमध्ये असायला हवं. तुमची तिकडे गरज आहे, असं मला पक्षाच्या नेतृत्त्वाकडून सांगण्यात आलं. हा मला माझा सन्मान वाटला आणि सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला,’ अशा शब्दांत फडणवीसांनी घटनाक्रम कथन केला.
हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र नहीं! मविआला पाठिंबा देणाऱ्या नोमानींचा VIDEO शेलारांकडून शेअर
राज्यात महायुतीला अतिशय स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘सरकारनं बाळासाहेब ठाकरेंना हिंदूहृदयसम्राट म्हटलं आहे. मग उद्धव ठाकरेंचा मित्र पक्ष असलेला काँग्रेस तसं का म्हणत नाही? त्यांना लाज वाटते का? राहुल गांधींचा विषय तर दूर राहिला आता तर उद्धव ठाकरेंची शिवसेनादेखील बाळासाहेब ठाकरेंना शिवसेना प्रमुख म्हणते. त्यांनीही बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणणं बंद केलं आहे,’ असा हल्ला फडणवीसांनी चढवला.