• Thu. Nov 14th, 2024
    अजित पवारांच्याही बॅगेची तपासणी, आत सापडले चकल्या अन् फरसाण, दादा म्हणतात खा बाबा…

    Baramati Ajit Pawar Bag Checking: बारामतीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या हॅलिकॅाफ्टरची तापासणी केली. अजित पवारांच्या सर्व बॅगा तपासण्यात आल्या.

    हायलाइट्स:

    • अजित दादांच्या हेलिकॉप्टर अन् बॅगची चेकिंग
    • बॅगमध्ये सापडल्या चकल्या, फरसाण लाडू
    • अजित दादा अधिकाऱ्याला म्हणतात
    महाराष्ट्र टाइम्स.कॉम
    बारामती अजित पवार हेलिकॉप्टर बॅग चेकिंग

    पुणे : यवतमाळमध्ये शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्याने उफाळलेला वाद ताजा असतानाच काल पुन्हा लातूरमध्येही याची पुनरावृत्ती घडली. औसा हेलिपॅडवर लँड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बॅगा पुन्हा तपासण्यात आल्या. यावेळी दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी स्वतः व्हिडीओ काढला. यावेळी त्यांनी बॅग तपासणाऱ्या अधिकाऱ्यांचे आयकार्ड आणि अपॉइंटमेंट लेटरही चेक केले. त्याचदरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देखील बारामती येथे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली आहे.राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत सगळे नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. मतदान जसजसं जवळ येत आहे, तसतसं प्रचाराला वेग येत आहे. राज्यातील प्रमुख नेते राज्यातल्या विविध जिल्ह्यात जाऊन जाहीर सभा घेत आहेत. यादरम्यान, राजकीय नेत्यांसोबत असणाऱ्या बॅगेची तपासणी देखील केली जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती येथे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली.

    Rohit Pawar : शरद पवार, अमित शहा आणि अदानींची बैठक झाली का? रोहित पवार दादांचं नाव घेत म्हणाले…

    बारामतीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या हॅलिकॅाफ्टरची तापासणी केली. अजित पवारांच्या सर्व बॅगा तपासण्यात आल्या. अजित पवारांनी फोनवर बोलत असाताना स्वतः बॅगा तपासण्यासाठी दिल्या. यावेळी एका बॅगेत चकल्या होत्या. बॅगेत चकल्या हातात घेऊन खा-खा बाबा…सगळ्या बॅगा तपास…त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर…असं अजित पवार अधिकाऱ्यांना बोलताना दिसले.

    दरम्यान, लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची विमानतळावर बॅगेची तपासणी करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी वणी येथेही असाच प्रकार झाला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडिओ करत कर्मचाऱ्यांची उलट तपासणी केली. तो व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर टाकला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होती. या सभेतही बॅग तपासणीवर त्यांनी जोरदार टीका केली. माझ्या बॅग तपासा…पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बॅग का तपासत नाहीत? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत विचारला

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed