Shiv Sena leader joins UBT : माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज सावंतवाडी येथे ठाकरे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे
ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन
शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पाडत एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का दिला आहे. त्यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा झेंडा हाती घेतला.
Uddhav Thackeray : माझं रक्ताचं नातं… शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, अमितला पाठिंबा नाही, उद्धव ठाकरेंची स्पष्ट भूमिका
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेमध्ये सुधीर सावंत यांचा जाहीर प्रवेश झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी सावंतांना शिवबंधन हाती बांधले.
Sudhir Sawant : निलेश राणेंच्या शिवसेना प्रवेशामुळे नाराज, माजी खासदाराला ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन
कोण आहेत ब्रिगेडियर सुधीर सावंत?
ब्रिगेडियर सुधीर सावंत हे काँग्रेसमधून खासदार होते. त्यानंतर त्यांनी स्वतःचा स्वराज पक्ष काढला होता. नंतर ते आम आदमी पक्षात सामील झाले होते. शिवसेना शिंदे गटाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी तिथे प्रवेश केला होता. आज ते शिवसेना शिंदे गटामधून ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
Worli Online Poll : ठाकरेंची धाकधूक वाढवणाऱ्या वरळीत कौल कुणाला? मटाच्या ऑनलाईन पोलचा अंदाज, युजर म्हणतात स्क्रीनशॉट काढून ठेवा
निलेश राणेंच्या प्रवेशामुळे नाराजी
निलेश राणे यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश झाल्यानंतर माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत हे नाराज असल्याची चर्चा होती. कारण नारायण राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सुधीर सावंत हे काही वर्ष राणेंपासून दूर होते. परंतु निलेश राणेंच्या शिवसेना प्रवेशानंतर सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या जाहीर प्रवेशाची चर्चा सिंधुदुर्गामध्ये रंगू लागली आहे.