Petition Against Nawab Malik Bail: नवाब मलिक सध्या प्रकृतीकारणामुळे जामिनावर बाहेर आहेत. मात्र, ते जामीन अटींचे उल्लंघन करत असून त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
आजारपणाच्या कारणाखाली अंतरिम जामीन देण्यास नकार
‘कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या टोळीतील सदस्यांशी संगनमत करून कुर्लामधील महिलेची जमीन हडप करत अवैध कमाई केली’, या आरोपाखाली ईडीने मलिक यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी ईडीने मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांना आजारपणाच्या कारणाखाली अंतरिम जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता.
Uddhav Thackeray: मुख्यमंत्री कुणाचाही होवो, महाराष्ट्रातील लुटारूंना हाकला, उद्धव ठाकरे बरसले
दीड वर्षांनंतर अंतरिम जामीन मिळाला, नवाब मलिक जामीनावर बाहेर
जवळपास दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना अंतरिम जामीन मिळाला आणि त्याची मुदत वेळोवेळी वाढवण्यात आली. त्यानंतर यावर्षी ३० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना प्रकृतीच्या कारणाखाली जामीन मंजूर केला. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांच्या प्रलंबित नियमित जामीन अर्जावर निर्णय होईपर्यंत तो जामीन वैध असेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. त्यामुळे मलिक हे सध्या जामिनावरच आहेत.
Nawab MaliK: जामीन अटींचे उल्लंघन करत असल्याचा दावा, नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी याचिका
नवाब मलिक जामिनाचा गैरफायदा घेत आहेत, त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी याचिका
या पार्श्वभूमीवर, मलिक यांच्या जामीन अर्जात हस्तक्षेप करण्यास परवानगी देऊन आपले म्हणणे ऐकावे, अशा विनंतीची याचिका सॅमसन पाठारे यांनी केली आहे. ‘मलिक हे न्यायालयाकडून प्रकृतीच्या कारणाखाली मिळालेल्या जामिनाचा गैरफायदा घेत आहेत. शिवाय प्रचाराच्या नावाखाली ते या गुन्हेगारी प्रकरणाविषयी माहिती असलेल्या संबंधित साक्षीदारांवर दबावही आणत आहेत. त्याद्वारे जामिनाच्या अटींचेच ते उल्लंघन करत आहेत’, असा दावा पाठारे यांनी याचिकेत केला आहे.