Raj Thackeray on reuniting with Uddhav Thackeray : मी आणि उद्धव एकत्र यावेत, यापेक्षा येऊ नयेत यासाठी अनेक जण प्रयत्न करत असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे. मी आणि उद्धव एकत्र यावेत, यापेक्षा येऊ नयेत यासाठी अनेक जण प्रयत्न करत असल्याचं राज म्हणाले. यामध्ये आतले आणि बाहेरचे असे दोघेही असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात पहिल्यांदा उतरले असताना, राज ठाकरेंची साद महत्त्वपूर्ण मानली जाते.
एकत्र यायचो असतो, तर कधीच आलो असतो
माझ्या बाजूने मी जागरुक असतो, माझ्यापर्यंत अनेक गोष्टी पोहचतात, की कोण काय बोललं, मात्र मी या गोष्टी ऐकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले. मी आणि उद्धव एकत्र यावं, असं वाटणं वेगळं. मात्र ते व्हायचं असतं, तर कधीच झालं असतं. समोरुन त्यांच्याकडून काही जण काहीतरी बोलत असतात, सांगत असतात, करत असतात, असंही राज ठाकरे म्हणाले.
Raj Uddhav Thackeray Reunion : उद्धव ठाकरेंसोबत येण्यास राज सकारात्मक! जगभरातले दुश्मन वाद मिटवतात, एकत्र येण्यासाठी चर्चा हवी
Aaditya Thackeray : शिंदे गटातही बंडाची तयारी? मंत्र्याचा ठाकरेंना फोन; उद्धवजी, तुमची जाहीर माफी मागून ८ तगड्या नेत्यांना परत आणतो
जगभरातले दुश्मन एकत्र येतात
माझी इच्छा किंवा एकट्याचा विषय नाही. यात चर्चा होणं गरजेचे आहे. जर चर्चाच होत नसेल तर, एकत्र येणार का हे बोलण्याला काय अर्थ आहे? जगभरातील एकमेकांचे वर्षानुवर्षांचे शत्रू वाद मिटवून एकत्र येऊ शकतात, पण, उद्धवना भावापेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी जवळची वाटते. यावर काय बोलणार? असा प्रतिप्रश्न राज ठाकरे यांनी केला.
Raj Thackeray : उद्धव ठाकरेंच्या हातून आजवर काही सुटलं नाही, बॅगेत फारतर हातरुमाल अन् कोमट पाणी, राज ठाकरेंची टोलेबाजी
एकत्र येण्यातील अडचणी कोणत्या?
हिंदुत्ववादी शिवसेनेचा वर्सोव्याचा उमेदवार हारुन खान, दिंडोशीचा उमेदवार उर्दूतून पत्रकं काढत असेल, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंचावर बाळासाहेबांचं नावही घेतलं जात नसेल, काँग्रेसची मफलर गळ्यात घालून उद्धव ठाकरे फिरणार असतील, तर याचा अर्थ सर्व गोष्टींचा व्यभिचार करायला तुमच्याकडे वेळ आहे पण बाकी गोष्टींसाठी नाही, ही आपली खंत आणि वास्तव असल्याचं राज म्हणाले.