Sada Sarvankar: शिंदेसेनेचे आमदार माहीम विधानसभा मतदारसंघात प्रचार करत असताना एका महिलेनं त्यांना जाब विचारला. या महिलेनं सरवणकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
माहीम कॉजवेमध्ये राहणाऱ्या ५० वर्षीय मंगला प्रशांत पटेल यांनी माहीम पोलीस ठाणं गाठून घडलेला प्रकार आणि त्यानंतर त्यांच्या लेकाला देण्यात आलेली धमकी याची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. मंगला यांचा २४ वर्षीय मुलगा जश शिक्षणासाठी अमेरिकेत वास्तव्यास आहे. त्याला मच्छिमार कॉलनीत राहणाऱ्या दोघांनी व्हॉट्स ऍप कॉलच्या माध्यमातून धमकी दिल्याचं मंगला तांडेल यांनी पोलिसांना सांगितलं.
Sada Sarvankar: फिश फूड स्टॉलवरुन आक्रमक पवित्रा; सरवणकर दारात येताच कोळी महिलेचा संताप; पिटाळून लावलं
पोलिसांना दिलेल्या माहितीत नेमकं काय?
‘आज ११ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२ च्या सुमारास विधानसभा निवडणुकीतील उमेदवार सदा सरवणकर यांची आमच्या राहत्या गल्लीत प्रचारफेरी सुरु होती. त्यावेळी त्यांनी मला नमस्कार केला. त्यानंतर मी त्यांना विचारणा केली की रेतीबंदर येथे असलेले आमचे सी फूड प्लाझा का बंद आहेत? त्याबद्दल तुम्ही काय केलं? त्यावरुन सदा सरवणकर हे मला उद्देशून ‘ताई आपण ते सुरु करु, आपण नंतर बसून बोलू,’ असं बोलत होते. त्यावेळी मी त्यांना आत्ताच उत्तर हवं आहे, असं म्हटल्यानं सरवणकर त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन तिथून निघून गेले. सदर व्हिडीओची क्लिप कोणाकडून व्हायरल झाली ते मला माहीत नाही,’ अशी माहिती मंगला तांडेल यांनी पोलिसांना लिखित स्वरुपात दिली आहे.
Sada Sarvankar: कोळी महिला सरवणकरांवर संतापली, प्रश्नांची सरबत्ती; प्रकरण थेट अमेरिकेला पोहोचलं, काय घडलं?
‘दुपारी ३ वाजून ५८ मिनिटांनी माझा मुलगा जशनं मला फोन करुन सांगितलं की त्याला मच्छिमार कॉलनीत राहणाऱ्या साहील तांडेल आणि हृतिकेश तांडेल यांचे व्हॉट्स ऍप कॉल आले होते. त्यांना त्याला कॉल करुन ‘तुझी आई आणि मावशीनं सदा सरवणकरांना हाकलून लावलं. आम्ही आता तुझ्या बापाला मारणार, सोडणार नाही,’ असं बोलून माझा मुलगा जश यास धमकी दिली. त्याबद्दल माझ्या मुलानं मला फोन करुन सांगितलं. सदरची घटना जरी घडली असली तरीही साहिल तांडेल व हृतिकेश तांडेल आमच्या परिचयाच्या आहेत. ते माझा मुलगा जशचे मित्र आहेत. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार सध्या करायची नाही,’ असं मंगला तांडेल यांनी स्पष्ट केलं आहे.