• Thu. Nov 14th, 2024
    वोट जिहादसाठी हवालाचे १२५ कोटी रुपये वापरले; सोमय्यांचा गंभीर आरोप; थेट मतदारसंघच सांगितला

    भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी वोट जिहादसाठी अडीचशे कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. बेनामी व्यवहार, हवालाच्या माध्यमातून वोट जिहाद सुरु असल्याचा आरोप करत सोमय्यांनी खळबळ उडवून दिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: लोकसभा निवडणुकीत १४ मतदारसंघांमध्ये वोट जिहाद झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. वोट जिहादला प्रत्युत्तर देण्यासाठी फडणवीस यांनी धर्मयुद्धाचं आवाहन केलं. यानंतर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी वोट जिहादसाठी अडीचशे कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. बेनामी व्यवहार, हवालाच्या माध्यमातून वोट जिहाद सुरु असल्याचा आरोप करत सोमय्यांनी खळबळ उडवून दिली आहे.

    वोट जिहादसाठी पैशांचा वापर होत आहे. हा पैसा येतो कुठून? असा सवाल सोमय्यांनी विचारला. ४ दिवसांपूर्वी मालेगावमध्ये अडीचशे कोटी रुपयाचे बेनामी व्यवहार हवालाच्या माध्यमातून झाले. हे व्यवहार आता बाहेर आले आहेत. सिराज अहमद आणि मोईन खान यांच्या बँक खात्यात एकूण १२५ कोटी रुपये जमा झाले. कधी ४० हजार रुपये, कधी १ लाख ४० हजार रुपये, कधी ४ लाख रुपये, कधी १ कोटी, अशा प्रकारे दोघांच्या बँक खात्यांमध्ये १२५ कोटींहून अधिक रुपये जमा झाले असा सनसनाटी दावा सोमय्यांनी केला.
    Sada Sarvankar: कोळी महिला सरवणकरांवर संतापली, प्रश्नांची सरबत्ती; प्रकरण थेट अमेरिकेला पोहोचलं, काय घडलं?
    सोमय्यांनी हवालाच्या माध्यमातून १२५ कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार झाल्याचा दावा केला. मालेगावात हा प्रकार घडल्याचा त्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वोट जिहादचा आरोप करताना सातत्यानं मालेगावचा उल्लेख करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसांनी त्यांनी मालेगावात वोट जिहाद झाला आणि त्यामुळेच महायुतीचा उमेदवार पराभूत झाला, असा दावा केला होता. अनेक भाषणांमध्ये त्यांनी याचा आवर्जून उल्लेख केला.

    Kirit Somaiya: वोट जिहादसाठी हवालाचे १२५ कोटी रुपये वापरले; सोमय्यांचा गंभीर आरोप; थेट मतदारसंघच सांगितला

    फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीत काय?
    धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्यमुळे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे पराभूत झाल्याचं फडणवीस यांनी त्यांच्या अनेक भाषणांमधून सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद बघायला मिळाला. धुळ्यातील सहा पैकी पाच मतदारसंघात आघाडीवर असलेला आमचा उमेदवार केवळ मालेगाव मध्य मतदारसंघात १ लाख ९४ हजार मतांनी मागे जातो आणि ४ हजार मतांनी हरतो, अशी आकडेवारी फडणवीसांनी वारंवार मांडली आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed