• Mon. Nov 25th, 2024
    सत्तेत जाण्याचा फॉर्म्युला काय? किंग, किंगमेकरची चर्चा फालतू म्हणत राज ठाकरेंचं त्रोटक उत्तर

    Raj Thackeray: यंदा मनसे सत्तेत बसलेली असेल, असं राज ठाकरे सातत्यानं प्रचारात, भाषणात सांगत आहेत. पण मनसे सत्तेत कशी बसणार असा प्रश्न मनसैनिकांना पडला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत असेल, असं पक्षप्रमुख राज ठाकरे सातत्यानं प्रचारसभांमध्ये सांगत आहेत. माझ्या हातात सत्ता द्या असं सांगणारे राज ठाकरे काही दिवसांपूर्वी भाजपचा मुख्यमंत्री होईल, असंही म्हणाले. त्यामुळे मनसैनिक बुचकळ्यात पडले. साहेबांच्या हाती सत्ता येणार, मग मुख्यमंत्री भाजपचा कसा होणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे. सत्तेत जाण्याचा नेमका फॉर्म्युला नेमका काय, असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला.

    यंदाच्या निवडणुकीत काय होईल ते कोणीही सांगू शकत नाही. महाराष्ट्रात फिरल्यावर परिस्थिती समजते. यंदा अनेक सरप्राईज मिळतील. १० दिवस थांबा, मग तुम्हाला कळेल, असं राज ठाकरे ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. तुमचं नेमकं काय ठरलंय, काही समझोता झालाय का, असे प्रश्न राज यांना विचारण्यात आले. त्यावर सरप्राईज आधी कसं सांगायचं? वाढदिवसाला ज्याच्यासाठी सरप्राईज पार्टी ठेवलीय, त्यालाच आपण काही सांगतो का?, असे प्रतिप्रश्न राज यांनी विचारले.
    Maharashtra Election: माहीम मोहीम फिस्कटली; पण राज, शिंदेची मोक्याच्या मतदारसंघात गट्टी; ठाकरेंचा शिलेदार अडचणीत?
    तुम्ही किंग होणार की किंगमेकर होणार हे सगळे फालतू, बालिश विषय आहेत. भाजपचा मुख्यमंत्री आमच्या पाठिंब्यानं होईल असं मी म्हणालो होतो. तो माझ्या मनातला विषय आहे. भाजपचं सरकार येईल असं मी बोलता बोलता म्हटलं. भाजपचं सरकार येईल म्हणजे महायुतीचं सरकार येईल. त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, हे माझं भाकित आहे. ही माझी आवड नाहीए, असं राज ठाकरे म्हणाले.

    Raj Thackeray: सत्तेत जाण्याचा फॉर्म्युला काय? किंग, किंगमेकरची चर्चा फालतू म्हणत राज ठाकरेंचं त्रोटक उत्तर

    महायुतीत तीन पक्ष आहेत. त्यात कोणाला मुख्यमंत्री करायचं हे त्यांचे वरिष्ठ नेते ठरवतील. पण आमच्या पाठिंब्याशिवाय ते सरकार होऊ शकणार नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं. मनसे प्रमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक केलं. ‘देवेंद्र फडणवीस यांची विषयांची समज, प्रश्नांचं आकलन चांगलं आहे. त्यांच्याकडे अनेक प्रश्नांची समस्यांची उत्तरं असतात,’ असं राज ठाकरे म्हणाले.
    शिंदेसेना-मनसे एक, फडणवीसांचा खास नेता सेफ? ‘उडी’ मारणाऱ्या उमेदवारासाठी राम मंदिरात बैठक
    यावेळी त्यांनी भाजप नेत्यांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांवर भाष्य केलं. ‘माझ्या आयुष्यात शिवसेनेनंतर अन्य कोणत्या पक्षाशी माझा संबंध आला असेल तर तो भाजपसोबत आलेला आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी या नेत्यांशी खूप जवळचे संबंध आले. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. बाळासाहेबांमुळे अटलजी तर माझ्या घरी येऊन गेले होते. ते बॉण्डिंग जास्त महत्त्वाचं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत तसा संबंध आला नाही. ज्यांच्यासोबत तुम्ही संवाद साधू शकता, त्यांच्यासोबत तुमचं चांगलं ट्युनिंग जमतं,’ अशा शब्दांत राज ठाकरे भाजप नेत्यांच्या संबंधांवर सविस्तर बोलले.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *