• Wed. Nov 13th, 2024
    सासरे शिवसेनेत होते, मेहुणा मनसेत, तुम्ही भाजपात; शेलार म्हणतात, माझा मुलगा मात्र…

    Maharashtra Election : आशिष शेलार यांनी घरातील वातावरणाबाबत सांगताना पत्नीला क्रेडिट दिले. घरात शक्यतो आम्ही राजकारणावर चर्चा करत नाही, असं आशिष शेलार म्हणाले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांचे सासरे सीताराम दळवी यांचे काही काळापूर्वी निधन झाले. मात्र शिवसेनेचे आमदार राहिलेले सासरे, मेहुणा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत, तर खुद्द शेलार भाजपात अशी राजकीय खिचडी कुटुंबात पाहायला मिळते. यावरुन प्रश्न विचारला असता, आशिष शेलार यांनी घरातील वातावरणाबाबत सांगताना पत्नीला क्रेडिट दिले.

    काय म्हणाले आशिष शेलार?

    “माझे सासरे सीताराम दळवी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार होते. उबाठाचे नाही. दुर्दैवाने गेल्या महिन्यात त्यांचं निधन झालं. माझी पत्नी राजकारणात नाही. त्यामुळे वडिलांसोबत ती मुलगी म्हणून असायची, भावाबरोबर ती बहीण असते, माझ्यासोबत ती पत्नी असते आणि मुलासोबत आई असते, माझा मुलगा कुठल्याच राजकीय पक्षात नाही” असं आशिष शेलार सांगत होते.

    पत्नीला श्रेय

    “या सगळ्याचं क्रेडिट मी माझ्या पत्नीला देतो, कारण माझी तर कुठलीच अडचण होत नाही, पण अडचण तिची होऊ शकते. मात्र प्रतिमाने घर म्हणून सर्व नात्यांना सांभाळलं. घरात शक्यतो आम्ही राजकारणावर चर्चा करत नाही” असं आशिष शेलार म्हणाले.
    IANS-Matrize Opinion Poll : ना उद्धव ना राज, मुंबई ठाकरेंवर नाराज? दोघांनाही एक-आकडी जागा, ओपिनियन पोलचे हादरवणारे अंदाज
    शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचं पाच ऑक्टोबर रोजी निधन झालं. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या निष्‍ठावान शिवसैनिकांपैकी ते एक होते. मनसे नेते संदीप दळवी यांचे वडील, तर भाजप नेते आशिष शेलार यांचे ते सासरे होत.

    Ashish Shelar : सासरे शिवसेनेत होते, मेहुणा मनसेत, तुम्ही भाजपात; शेलार म्हणतात, माझा मुलगा मात्र…

    नगरसेवक ते आमदार

    सीताराम दळवी हे अंधेरी विधानसभा मतदारसंघातून १९९५ साली शिवसेनेच्‍या तिकिटावर आमदारपदी निवडून आले होते. त्‍याआधी त्यांनी मुंबई महापालिकेत नगसेवक पद भूषवलं होतं. अनेक वर्ष ते शिवसेनेत कार्यरत होते.
    Amit Thackeray : उद्धव ठाकरेंचा उमेदवार म्हणाला ‘तो बालिश आहे’, अमित ठाकरेंचं एका शब्दात उत्तर, बायकोलाही हसू अनावर

    बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेल्या निष्‍ठावान शिवसैनिकांपैकी ते एक होते. शिवेसेनेच्‍या उमेदीच्‍या काळात मुंबई आणि महाराष्‍ट्रात झालेल्‍या अनेक आंदोलनांमध्ये ते सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील आरोस हे त्‍यांचं मूळ गाव, मात्र मुंबईतील अंधेरीत त्‍यांचं अखेरपर्यंत वास्‍तव्‍य होतं.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed