• Mon. Nov 25th, 2024
    एका दगडात दोन पक्षी, काँग्रेस सत्तेत आल्यास दबंग महिला आमदाराच्या हाती मुख्यमंत्रिपद? हायकमांडचा विचार

    Maharashtra Assembly Election 2024 : दिल्लीतील नेत्यांकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी महिला नेत्याला संधी देण्याचा विचार सुरू आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    Rahul gandhi (5).

    म. टा. वृत्तसेवा, अमरावती: राज्यात सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार यावरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसकडून नाना पटोले यांचे नाव पुढे केले जात आहे. दिल्लीतील नेत्यांकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी महिला नेत्याला संधी देण्याचा विचार सुरू आहे. यात माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांचे नाव अग्रक्रमावर आहे. यातून विदर्भ आणि महिला असे दुहेरी समीकरण साधण्याचा काँग्रेसचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विदर्भातील ६२ मतदारसंघांमध्ये २ कोटी ३७ हजार २२१ मतदारांपैकी १ कोटी ४६ लाख ९०५ महिला मतदारांची संख्या आहे. या महिला मतदारांवर सर्वच पक्षांकडून फोकस केला जात आहे.

    नागपुरात संविधान सन्मान महिलेला सधी देऊन काँग्रेसची प्रतिमा उंचावण्यासाठी ‘हायकमांड’चा प्रयत्न संमेलनाच्या निमित्ताने राहुल गांधी आले असता ‘महिलाओं के सन्मान मे राहुल गांधी मैदान मे’ असे नारे देण्यात आले होते. पण, काँग्रेसने किती महिलांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली असा सवालही यानिमित्ताने केला गेला. संमेलनाला उपस्थित महिला सदस्यांनीच दबक्या आवाजात हा विषय मांडला. विधानसभा निवडणुकीत ५० टक्के मतदार महिला असतानाही पक्षाकडून अपेक्षित विचार होत नसल्याची खंतही व्यक्त केली. महायुतीकडून लाडकी बहीणच्या माध्यमातून महिलांना जोडण्याचे काम होत असताना काँग्रेसकडे काहीही ‘तोड’ नसल्याचीही खंत व्यक्त झाली. यावर उपाय म्हणून थेट मुख्यमंत्रिपदाचा चेहरा वैदर्भीय महिलेचा देऊन काँग्रेस या उणिवेवर मात करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
    महाराष्ट्राच्या अदानीकरणाचा घाट; सोलापुरात उद्धव ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका
    दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे यांच्याही नावावर विचार होत असल्याची माहिती आहे. अॅड. यशोमती ठाकूर या विदर्भाचे प्रतिनिधित्व करतात. अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९ अशा तीन टर्म निवडून आल्या. ठाकरे सरकारमध्ये महिला व बालकल्याण मंत्री म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. यापूर्वी त्यांचे वडीलही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यांचा वारसा अॅड. यशोमती ठाकूर चालवित आहेत.
    दुश्मनी जम कर करो लेकिन…, ‘थोरात-विखे’ वादावर बाळासाहेब थोरात यांचा चिमटा, काय म्हणाले?
    राज्यात सर्वाधिक ६२ जागा या प्रदेशात आहेत. शिवाय पटोले यांना डावलल्यास विदर्भात असंतोष उफाळून येऊ शकतो. या प्रदेशावर अन्याय केल्याची भावनाही वाढीस लागू शकते. त्यामुळे याच प्रदेशातील महिलाला संधी देण्याचा विचार मांडण्यात आला. यातूनच अॅड. ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *