Raigad Crime News: काही महिन्यांपूर्वी आमच्या शेतावरील बोअरवेल मधील मोटार काढून चोरून नेली व त्याचबरोबर बोअरवेल मध्ये दगड टाकून त्याचेही नुकसान करण्यात आले होते.
हायलाइट्स:
- समाजकंटकांकडून शेतकऱ्याच्या भात पिकाची राख रांगोळी
- शेतात साठवून ठेवलेल्या २५० हून अधिक भाताचे भारे पेटवले
- पहाटेच्या सुमारास काही अज्ञात विकृत वृत्तीच्या प्रवृत्तींनी पेटवून दिले
वर्षातून एकदाच भाताचे उत्पन्न घेऊन वर्षभर उदरनिर्वाह होईल इतके धान्य पिकवून हे कुटूंब आपला उदरनिर्वाह करत असतं. आधीच नैसर्गिक संकटांनी शेतकरी हवालदिल झालेला असताना अशा प्रकारची घटना घडवून साक्षात अन्नाला पायदळी तुडवून राखरांगोळी करण्याचा अतिशय निंदनीय आणि विकृत प्रकार तालुक्यात घडला आहे. आज या शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकविलेला तोंडाशी आलेला घास असा काही नराधमांनी हीन कृत्य करत नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याची पोलिसांमार्फत सखोल चौकशी होऊन ज्यानी कोणी हा प्रकार केला आहे तो जनतेसमोर येणे गरजेचे आहे अशी मागणी सर्व स्तरावर होत आहे.
Amit Shah: आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पण निवडणुकीनंतर…; अमित शहांचं सूचक विधान
काही महिन्यांपूर्वी आमच्या शेतावरील बोअरवेल मधील मोटार काढून चोरून नेली व त्याचबरोबर बोअरवेल मध्ये दगड टाकून त्याचेही नुकसान करण्यात आले होते. आता तर अत्त्योच्च गाठत वर्षभराच्या आमच्या अन्नधान्याची नासधूस करून त्याची राख रांगोळी करण्यात आली आहे. हा पूर्ण प्रकार राजकीय वैमानस्यातून केला असल्याची दाट शक्यता आम्हाला वाटते तसेच अशा प्रकारच्या घटना घडवून अन्नाची नासधूस म्हणजे एकप्रकारे माता लक्ष्मीची विटबंनाच आहे. ज्या कोणी नराधम आणि नपुसंक वृत्तीने हा प्रकार केला आहे त्यांनी लक्षात ठेवावे की असे करून आमचे कुटूंब उपाशी राहणार नसून ज्यांनी हे पाप घडवून आणले आहे. त्यांना याचे प्रायचित्त इथेच फेडावे लागणार आहे. आम्ही पोलिस प्रशासनाला विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी करून लवकरात लवकर गुन्हेगारांना सर्वांसमोर आणावे. अन्यथा आज आमचे नुकसान झाले आहे उद्या परिसरातील इतरांचेही नुकसान करतील. म्हणून अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचून आळा घालणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया कुटुंबाने दिली.