• Sat. Sep 21st, 2024
वंचित बहुजन आघाडीकडून पाचवी यादी जाहीर; पालघर, रायगड, मुंबईतील उमेदवारांची घोषणा

मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने मुंबई दक्षिण मध्यमधून अब्दुल हसन खान यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी त्यांना मुंबई उत्तर मध्यमधून उमेदवारी देण्यात आली होती.वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी आज पाचवी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीत १० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

दरम्यान, रायगड लोकसभा मतदार संघातून कुमुदिनी रविंद्र चव्हाण, उस्मानाबाद मतदारसंघातून भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर, नंदुरबारमधून हनुमंत कुमार मनराम सूर्यवंशी, जळगावमधून प्रफुल कुमार रायचंद लोढा, दिंडोरी लोकसभामधून गुलाब मोहन बरडे, विजया दिनकर म्हात्रे यांना पालघर लोकसभा मतदारसंघातून संधी मिळाली आहे.

भिवंडी लोकसभेतून निलेश सांबरे, मुंबई उत्तरमधून बिना रामकुबेर सिंग, मुंबई उत्तर दक्षिणमधून संजीव कुमार आप्पाराव कलकोरी, मुंबई दक्षिणमधून अब्दुल हसन खान यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
ठाकरेंनी भाजपकडून जी जागा २०१९ ला मागून घेतली, तिथे नोटापेक्षाही कमी मतं मिळाली
विशेष म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर हे कालच प्रकाश आंबेडकरांच्या अकोल्यातल्या निवासस्थानी दाखल होत भेट घेतली होती. आंधळकर आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये अकोल्यातल्या यशवंत निवासस्थानी बंद दाराआड चर्चा झाली. आंधळकर उस्मानाबादमधून लोकसभेसाठी इच्छुक होते. २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा त्यांच्यात झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच आज भाऊसाहेब आंधळकर यांना वंचितकडून उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून यांना उमेदवारी जाहीर झाली.
महाडमधील महायुतीच्या सभेत नेत्यांचा एल्गार; मविआच्या उमेदवारावर घणाघाती टीका, म्हणाले…
उस्मानाबादमधील भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर
भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर माजी पोलीस निरीक्षक होते. यांची राजकीय कारकीर्द ही शिवसेनेतून झाली. शिंदे गट अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. भाऊसाहेब आंधळकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच नगरपरिषद बार्शी या निवडणुका लढवल्या आहेत. बार्शी शहर तसेच उस्मानाबाद मतदार संघामध्ये लिंगायत समाजाचे प्राबल्य असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने त्यांना संधी दिल्याचे समजते.

वंचित बहुजन आघाडीकडून बारामतीतून उमेदवार नाही, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

भाऊसाहेब आंधळकर यांनी बार्शी तालुक्यात एकाही ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले नाही. अपक्ष आमदार राजाभाऊ उर्फ राजेंद्र राऊत यांच्याबरोबर त्यांचे राजकीय मतभेद आहेत. वेगवेगळ्या राजकीय वक्तव्यामुळे भाऊसाहेब आंधळकर हे चर्चेत असतात. आज वंचित बहुजन आघाडीने त्यांची उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघतील उमेदवारी जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed