• Mon. Nov 25th, 2024
    अमित शाहांची भेट ते शिवसेनेच्या शिंदेंचे प्रमुख, राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी

    मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवतिर्थावर जनतेशी संवाद साधत आहेत. शिवतिर्थावरील सभेच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी अमित शाहांच्या भेटीबाबत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. अमित शाहांच्या भेटीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, मागील अनेक दिवसांपासून मी माझ्या आणि अमित शाहांच्या भेटीबाबत अनेक गोष्टी वाचत, ऐकत होतो.

    ‘शिंदेंच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायचं असतं तर तेव्हाच झालो असतो. तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेऊ नका. मी कोणत्याही शिवसेनेचा पक्षाचा अध्यक्ष, मुख्यमंत्री होणार नाही. मी जे अपत्य जन्माला घातलं आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या सर्वाच्या विश्वासावर हा पक्ष उभा केला आहे. त्याला आज १८ वर्ष झाली आहेत. असली गोष्ट माझ्या मनाला शिवतही नाही’ असं म्हणत राज ठाकरेंनी कोणत्याही पक्षासोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.

    ‘माझं काही ठरलं, तर पत्रकार परिषद घेईन, भाषण करेन, येऊन सांगेन. मुख्यमंत्री व्हायचं असतं तर तेव्हाच झालो असतो. मला पक्ष फोडून कोणतीही गोष्ट करायची नाही. ‘

    ‘माझ्या चिन्हाच्या बाबतीतही अफवा. ‘रेल्वे इंजिन’ हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे. त्याच चिन्हावर आमची वाटचाल सुरु राहणार. कोणत्याही तर्क-वितर्कांवर विश्वास ठेवून नका’, असंही राज ठाकरे म्हणाले.

    लावरे तो व्हिडीओ म्हणणारे राज ठाकरे ओरिजनल, आता ते कोणत्या तरी दबावा खाली आहेत | बाळासाहेब थोरात

    ‘३२ आमदार आणि सहा सात खासदार माझ्या सोबत होते. त्यावेळी मी काँग्रेसमध्ये सहभागी होईल, अशी शक्यता काहींना वाटत होती. पण मी पक्ष फोडून कोणतीही गोष्ट करायाची नाही. आता मनात विचार नाही पण पुढे काही केलं स्वत:चा पक्ष काढेन, पण कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. माझ्या मनाशी ही खूणगाठ बांधली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही.’, अशी आठवणही यावेळी बोलताना राज ठाकरेंनी सांगितली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed