• Sat. Sep 21st, 2024

अवैध विक्रेते आणि पँट्रीकार कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी, दानापूर एक्स्प्रेसमधील घटना; नागपूर रेल्वे स्थानकावर गोंधळ

अवैध विक्रेते आणि पँट्रीकार कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी, दानापूर एक्स्प्रेसमधील घटना; नागपूर रेल्वे स्थानकावर गोंधळ

जितेंद्र खापरे, नागपूर : दानापूर एक्स्प्रेसच्या पँट्री कारमध्ये बेकायदेशीरपणे मालाची विक्री करणाऱ्या ठेकेदाराच्या लोकांची, पँट्री कारच्या विक्रेत्यांशी बाचाबाची झाली. हे प्रकरण इतकं वाढलं की नागपूर रेल्वे स्थानकावरही त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर आरपीएफकडून मारहाण करणाऱ्या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे.

रेल्वे सुरक्षा दलाच्या कडक कारवाईनंतरही रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांवरील अवैध फेरीवाल्यांची संख्या कमी होत नाही. आता आपला माल विकण्याच्या शर्यतीत ही भांडणं होत आहेत. दानापूर सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला असून इथे बेकायदेशीर विक्रेते आणि पँट्री कार कर्मचारी यांच्यात जोरदार हाणामारी झाली. त्यामुळे नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर काही काळ गोंधळ उडाला.
दुर्दैवी! सफाई करण्यासाठी चौघे टाकीत उतरले, तेवढ्यातच नियतीने डाव साधला, मजुरांचा करुण अंत
बैतुल ते नागपूरपर्यंत पाणी, कोल्ड्रिंक्स आणि ताक यांसारख्या पेयांची विक्री करणाऱ्या बेकायदेशीर विक्रेत्यांचा पँट्री कारच्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला. कर्मचाऱ्यांनी अवैध विक्रेत्याला पाण्याच्या बाटल्या विकण्यापासून रोखल्याचं सांगितलं जात आहे. शिवीगाळ केल्यानंतर काही वेळातच त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण पँट्री कारच्या व्यवस्थापकापर्यंत पोहोचले, त्यांनी काही अवैध विक्रेत्यांना पँट्री कारमध्येच बसवले.
धक्कादायक! तरुणीने सिगारेटचा धूर तोंडावर सोडला, तरुणाने व्हिडिओ बनवला; संतापात दोघींनी मित्राच्या साथीनं युवकाला संपवलं

मोकाट वळूंच्या झुंजीत नागपुरात अनेक वाहनांचे नुकसान, नागरिकांमध्ये दहशत

या दरम्यान ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर पोहोचली. रेल्वे स्थानकावर थांबताच त्यांच्यात पुन्हा बाचाबाची सुरू झाली. दरम्यान, रेल्वे स्थानकावर गस्त घालत असलेल्या आरपीएफच्या पथकाने तेथे पोहोचून प्रकरण शांत केलं. त्यानंतर हल्ला करणाऱ्या चार तरुणांनाही अटक करण्यात आली. मात्र, या घटनेदरम्यान नागपूर रेल्वे स्थानकावर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed