• Sat. Sep 21st, 2024

Ajit Pawar: मग चोरले-चोरले कसे म्हणता? अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले

Ajit Pawar: मग चोरले-चोरले कसे म्हणता? अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले

पुणे (मुस्तफा आतार): मी पक्ष चोरला नाही. पुढच्या पिढीने वारसा पुढे नेला तर त्याला चोरले कसे म्हणता ? पुढच्या पिढीकडे त्याची जबाबदारी जाणार होती ना? मग चोरले-चोरले कसे म्हणता, अशा शब्दांत अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले. ‘पक्ष काय माझ्या एकट्याच्या हातात गेला का? छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे ८० टक्के आमदार माझ्यासोबत आहेत. मी काय त्यांना पैसे दिले का? माझी भूमिका पटली म्हणून ते सोबत आलेत ना, असेही त्यांनी विचारले.

भूमिकेत धरसोड कशी चालेल?
बारामती, पुरंदरच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी पक्षासह चिन्हही चोरले, अशा शब्दांत अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला अजित पवार यांनी बारामतीत उत्तर दिले. ‘तुम्ही म्हणालात, २०१४ मध्ये भाजपाला पाठिंबा द्या. पाठिंबा दिला. नंतर म्हणाले, माघार घ्या. आम्ही माघार घेतली. २०१९ मध्ये पुन्हा पाठिंबा दिला. नंतर माघार घ्या म्हणाले. माघार घेतली. असे कसे चालेल, असे त्यांनी विचारले.
Raj Thackeray: लोकसभेसाठी पाठिंबा देताना विधानसभेसाठी राज ठाकरेंचा महायुतीला ‘क्लिअर मेसेज’

घड्याळाशिवाय पर्याय नाही
‘मी फुले शाहू आंबेडकर विचारधारा सोडली नाही. अठरापगड जातींना घेऊन जात आहे. बारामतीत हा विकासाचा वेग सुरू ठेवायचा असेल तर घड्याळाशिवाय पर्याय नाही.‘भावनिक होऊ नका,’ असे अजित पवार यांनी आवाहन केले.
Baramati Lok Sabha: …तरच फिट्टमफाट होईल, त्यामुळे यावेळी सुनेला निवडून द्या-अजित पवारांचे बारामतीकरांना आवाहन

कोणी नाही, त्याला अजित पवार वाली
जानाई शिरसाई, पुरंदर उपसाच्या कामात मी लक्ष घालणार, असे पवार यांच्या वक्तव्याचा संदर्भ अजितदादांनी दिला. ‘मोदी, शहा, उद्योगपतींशी ओळख झाली. ते आपला शब्द पडू देत नाहीत. अजून पल्ला गाठायचा की नाही हे तुमच्या हातात आहे. सुप्यासारख्या गावात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. आता कामाचे दिवस आहेत. कोणीही काही सांगेल. केंद्र सरकार त्यांच्या हातात नाही. ते काय करू शकणार,’ असे अजित पवार म्हणाले. ‘बारामतीत कोणाला वाली नाही, त्याला अजित पवार वाली’, असे त्यांनी नमूद केले.

भावासाठी फिरले नाहीत आता गरागरा फिरतायत, सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या भावंडांना अजित पवारांचा टोला

आता का फिरावे लागते?पवार सध्या बारामती मतदारसंघात दौरे करीत आहेत. ‘बारामतीकरांना माहिती आहे, की अर्ज भरल्यानंतर बारामतीत त्यांची शेवटी सभा व्हायची. आता का फिरावे लागतेय? का ही वेळ आली. आम्ही सांगत होतो ना. आम्ही करतोय. मी राज्य चालवू शकत नाही का? प्रशासनावर माझी पकड नाही का? अधिकारी माझे ऐकत नाहीत का? प्रशासनावर माझी पकड आहे हे कोणीही नाकारू शकत नाही, असे अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed