• Mon. Nov 25th, 2024

    ठाकरेंची नकली शिवसेना, एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातायेत, मोदींचा चंद्रपुरात येऊन हल्लाबोल

    ठाकरेंची नकली शिवसेना, एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातायेत, मोदींचा चंद्रपुरात येऊन हल्लाबोल

    चंद्रपूर : आपल्या कर्माने जनतेचा पाठिंबा काँग्रेसने गमावला. फोडा आणि राज्य करा हीच काँग्रेसची नीती असल्याचा हल्लाबोल करत उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली आहे, एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातायेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. चंद्रपुरात काँग्रेसचा उमेदवार असल्याने ते शिवसेनेवर बोलणे टाळतील, अशी सर्वसाधारण अपेक्षा असताना त्यांनी ठाकरेंनाही लक्ष्य केले.लोकसभेची नको असलेली उमेदवारी गळ्यात मारल्यानंतर पक्षाच्या आदेशाखातर चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या दोन आठवड्यापासून प्रचाराला सुरूवात केली आहे. आज तर त्यांच्या प्रचाराला दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपुरात आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइंचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले शिवाय केंद्रीय मंत्री आणि महायुतीच्या राज्यातील मंत्र्यांनीही सभेला हजेरी लावली.
    विशाल पाटील काँग्रेसचे कार्यकर्ते, त्यांचे प्रमुख नेते समजूत काढतील, सांगली आमचीच, संजय राऊतांनी ठणकावलंमराठीतून भाषणाला सुरूवात करत पंतप्रधान मोदींनी गुढीपाडवा आणि नववर्षाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी लगोलग आपला मोर्चा विरोधकांकडे वळवून अनेक मुद्द्यांवरून काँग्रेस आणि शिवसेनेला लक्ष्य केले.

    जोपर्यंत देशात देशात इंडिया आघाडी आणि राज्यात ठाकरे सरकार होते, तेव्हा जनतेची उपेक्षा होत राहिली. मात्र सत्तातरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार वेगाने काम करत आहे. नियत चांगली असली की निकालही चांगले असतात, अशा शब्दात त्यांनी विद्यमान सरकारचे कौतुक केले. त्याचवेळी मविआ सरकार असताना कोणाचा किती हिस्सा? कुठला ठेका कुणाला? मलईदार खाती कुणाला द्यायची? याचमध्ये महाराष्ट्राचा विकास त्यांनी पणाला लावला. महाराष्ट्राच्या विकासाचा प्रकल्प आला की हे लोक कमिशन मागायचे. त्यांनी अनेक योजना बंद केल्या. तसेच समृद्धी महामार्गालाही विरोध केला. कोकणातील प्रकल्प रोखला. कमिशन द्या अन्यथा कामात खोडा घालू, हे त्यांचे लक्ष्य होते, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

    स्मारकाच्या भूमीपूजनाला स्टेजवर मिरवणारा एकही नेता बलिदान दिनी वढू बुद्रुकला आला नाही : अमोल कोल्हे

    त्याचेवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेनेची उपमा देत एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातायेत, अशा शब्दात शिंदे यांचे कौतुक केले. यावेळी महायुती नक्कीच ४०० जागांचा टप्पा पार करेल, असा आत्मविश्वास व्यक्त करताना महाराष्ट्राची साथही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed