• Sun. Nov 24th, 2024

    माफत दरात फोटोग्राफीचं शिक्षण, गरजूंना नोकरी-व्यवसाय करता यावा यासाठी ‘रे ऑफ लाईट’ संस्था १५ वर्षांपासून कार्यरत

    माफत दरात फोटोग्राफीचं शिक्षण, गरजूंना नोकरी-व्यवसाय करता यावा यासाठी ‘रे ऑफ लाईट’ संस्था १५ वर्षांपासून कार्यरत

    डॉ. नितीन सोनावणे, मुंबई : समजातील गरीब आणि गरजूंना फोटोग्राफीतील तांत्रिक आणि व्यावसायिक ज्ञान अत्यंत माफक दरात शिकवण्याचं कार्य ‘रे ऑफ लाईट’ ही सामाजिक संस्था गेली १५ वर्ष करते आहे. आतापर्यंत जवळपास चार हजार विद्यार्थ्यांनी या सामाजिक संस्थेमार्फत फोटोग्राफीचे तांत्रिक शिक्षण घेतले आहे. यातील असंख्य विद्यार्थी हे स्वतःचा व्यवसाय करत आहेत. तसेच काही विद्यार्थी फोटोग्राफर म्हणून विविध ठिकाणी कामाला लागले आहेत.

    कुठलाही सोहळा असो किंवा कुठलाही कॉर्पोरेट इव्हेन्ट असो, फोटोग्राफर सगळीकडे हवाच असतो. फोटोग्राफी ही शाखा फारच विस्तीर्ण असल्यामुळे यामध्ये स्वयं रोजगारापासून ते रोजगारापर्यंत बऱ्याचशा संधी उपलब्ध आहेत. उदरनिर्वाह पटकन मिळवून देण्यासाठी फोटोग्राफी ही शाखा इतरांच्या मानाने फारच पुढे आहे. या कलेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करता यावा, यासाठी ही संघटना झटते आहे.

    संघटनेच्या दहा रविवारच्या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना बेसिक फोटोग्राफी पासून ते ॲडव्हान्स फोटोग्राफीपर्यंत सर्व काही शिकवले जाते. या अभ्यासक्रमात फोटोग्राफीचा इतिहास, कॅमेरा आणि कॅमेऱ्याचे प्रकार, डिजीटल कॅमेरा आणि त्याची नियंत्रणे, रचनाकृती आणि फोटोग्राफीसाठी आवश्यक असे ग्रामर, टेबलटॉप फोटोग्राफी, मॉडेलिंग फोटोग्राफी, फ्लॅश फोटोग्राफी, ज्वेलरी फोटोग्राफी, फंक्शन फोटोग्राफी, आऊटिंग, इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात.

    ray of light

    संस्था अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन विद्यार्थ्यांना वरील गोष्टी शिकवते. हे सर्व प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून प्रोजेक्टरचा उपयोग करुन मोठ्या स्क्रिनवर शिकवले जाते. यामुळे कमीत कमी वेळेत विद्यार्थ्यांना जास्त गोष्टींचे आकलन होते.

    ray of light

    विशेष म्हणजे हे सर्व मराठीतून, हिंदीतून तसेच इंग्रजीमधून देखील शिकवले जाते. त्यामुळे कमी शिक्षण असलेल्या विद्यार्थ्यांना देखील या कोर्सचा फायदा होतो. या संस्थेत फोटोग्राफी शिकण्यासाठी वयाची अट नाही. तसेच स्वत:चा कॅमेराही असणे देखील गरजेचे नाही. संघटनेच्या कॅमेऱ्यावर विद्यार्थ्यांना फोटोग्राफी शिकवली जाते. तसेच, यात महिलांना देखील प्राधान्य देण्यात येते. लवकरच ‘रे ऑफ लाईट’ या सामाजिक संस्थेची २५वी फोटोग्राफी बॅच सुरू होत आहे.

    ray of light

    (फोटो सौजन्य : डॉ. नितीन सोनावणे)
    अधिक माहितीसाठी संपर्क: मोबाईल क्रमांक : ९८२० ५५० ९५७,

    ई मेल : [email protected]

    फेसबुक पेज : https://www.facebook.com/rayoflight3527

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *