• Mon. Nov 25th, 2024
    रावेर लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांकडून श्रीराम पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब

    निलेश पाटील, जळगाव: रावेर लोकसभेसाठी अनेक दिवसांचा तिढा अखेर आज पाच तासांच्या बैठकीनंतर सुटला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उद्योजक तथा मराठा चेहरा म्हणून श्रीराम पाटलांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली आहे. या नावावर उद्या शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून वेगवेगळे नाव उमेदवारीसाठी समोर येत होते. अनेक अनेक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून खुद्द उमेदवारी जाहीर करून प्रचाराची सुरुवात तथा मिरवणूक देखील काढली होती. मात्र ऐन वेळेस श्रीराम पाटील यांचे नाव समोर आल्याने पक्षश्रेष्ठींकडून यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
    धाराशिव मतदारसंघासाठी आग्रह, तानाजी सावंतांच्या पुतण्याचे ठाण्यात शक्तिप्रदर्शन, अपक्ष लढण्याच्या तयारीत
    भाजपने आपला उमेदवार जाहीर करून १५ ते २० दिवस झाले तरी विरोधी पक्षाकडून अद्याप उमेदवार जाहीर होत नव्हता. शरद पवार नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागून होते. यात शरद पवार सक्षम उमेदवाराच्या शोधात होते. यात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी डॉक्टरांचे कारण सांगून मैदान सोडून पळ काढला. तर रोहिणी खडसे हे विधानसभेचे उमेदवार असणार, असे खडसे यांनी सांगितले होते. त्यामुळे उमेदवार नेमका कोण असेल ही चर्चा सुरू होती.

    कोण आहेत श्रीराम पाटील?

    यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचे नाव सर्वात आघाडीवर सुरू होते. रवींद्र पाटील हे रक्षा खडसे यांना तगडे आव्हान देऊ शकत नसल्यामुळे कदाचित त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली. श्रीराम पाटील हे मोठे उद्योजक म्हणून जिल्ह्यात प्रख्यात आहेत. त्याचबरोबर त्यांचे गेल्या अनेक वर्षापासून रावेर लोकसभेमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तसेच श्रीराम पाटील हे आधी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार होते. ते अजित पवार यांची तारीख सुद्धा त्यांनी निश्चित केली होती. मात्र ऐन वेळेस अजित पवार यांचा दौरा रद्द झाल्याने श्रीराम पाटील यांचा प्रवेश लांबला गेला.

    जनता हीच सर्वश्रेष्ठ हे सगळ्या राजकीय पक्षांना मानावं लागेल; राजू शेट्टींनी निवडणुकीचा निकाल सांगितला

    त्यानंतर फेब्रुवारीमध्ये भाजप पक्षात त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटात सहभागी होऊन रावेर लोकसभेची उमेदवारी मिळवली. श्रीराम पाटील हे मराठा समाज म्हणून ओळख आहे. एकनाथ खडसे हे येत्या पंधरा दिवसांमध्ये भाजपात प्रवेश करणार असल्याचे खुद्द एकनाथराव खडसे यांनी जाहीर केले. आज ते पुणे येथे झालेल्या बैठकीला गैरहजर होते. मात्र त्यांची कन्या रोहिणी खडसे या त्या बैठकीला हजर होत्या. यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांना ही निवडणूक सोपी जाऊ नये, यासाठी शरद पवार यांनी मराठा कार्ड या रावेर लोकसभा मतदारसंघात खेळले आहे. या मतदारसंघात सर्वात जास्त मराठा समाजाचे मतदान आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांना शह देण्यासाठी श्रीराम पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मैदानात उतरले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed