• Sat. Sep 21st, 2024

गद्दारांना मदत करणार नाही, राज ठाकरेंपर्यंत भावना पोहचवू, मनसे आमदार राजू पाटील आक्रमक

गद्दारांना मदत करणार नाही, राज ठाकरेंपर्यंत भावना पोहचवू, मनसे आमदार राजू पाटील आक्रमक

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडल्याचा एक खोटा संदेश समाज माध्यमांतून व्हायरल झाला आणि मनसे पुन्हा एकदा चर्चेत आली. त्यातच रविवारी डोंबिवली व कल्याण ग्रामीण भागात मनसेच्या वतीने नवचैतन्य रॅली काढत शक्तिप्रदर्शन करण्यात आले, त्यामुळे ही निवडणुकीची नांदी तर नाही ना, अशी चर्चा होऊ लागली. दुसरीकडे ज्यांनी आमच्या पक्षाशी गद्दारी केली, त्या गद्दारांना आम्ही मदत करणार नाही. आमच्या भावना आम्ही राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवू, असे म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचे नाव घेता सुनावले आहे.

दिवा, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर आणि बदलापूर येथील पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या मनसेने केल्या असून त्यांचे नियुक्ती पत्रक वाटप राजू पाटील यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांचा हुरूप वाढविला. मात्र पाडव्याच्या दोन दिवस आधीच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी विधानसभा निवडणूक २०१९ ची आठवण करून देत कधीही निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे.

राजू पाटील म्हणाले, २०१९ ची विधानसभा निवडणूक आपण लढणार नव्हतो. मात्र राज ठाकरेंनी सांगितलं, की आपल्याला निवडणूक लढायची आहे. १९ सप्टेंबर २०१९ ला राज साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की कल्याण ग्रामीण विधानसभा तुला लढायची आहे. त्यावेळी राज साहेबांना मी बोललो की मी लंडनला चाललो आहे मुलाला घेऊन. २८ ला मी येईन, तर त्यानंतर तयारी करू आणि निवडणूक होती २४ ऑक्टोबरला. म्हणजे जेमतेम २६ दिवस आपल्या हातात असताना आपण तयारी केली आणि पक्षाला एक आमदार देखील निवडून दिला. सांगायचं तात्पर्य हेच आहे की आपण नेहमी तयार असतो आणि तयार असायलाच पाहिजे.
सातारा-माढ्याचा तिढा कधी सुटणार? उमेदवारीचा सस्पेन्स फोडण्याचा मुहूर्त ठरला, कोण कोण शर्यतीत?
आपण स्वतःला मनसैनिक म्हणवतो सैनिकांनी नेहमी सतर्क असले पाहिजे. राज साहेब पाडव्याला आपल्याला काय सांगतील हे माहीत नाही. जर साहेब बोलले तयार रहा तर, तर साहेबांना आपण सांगू शकतो आम्ही तयार आहोत. आपण तयार आहोत आणि आपण तयार असलोच पाहिजे.. साहेब जो निर्णय देतील तो आपल्या पुढे घेऊन न्यावा लागेल. परंतु एवढेच सांगतो की पाडव्याची सभा जोरात करायची आहे. तिथून जो साहेब आपल्या आदेश येतील तिथून आपण पुढची वाटचाल करायची आहे, असे पाटील म्हणाले. आमदार पाटील यांनी तयारी केली आहे का? राज ठाकरे मनसैनिकांना काय आदेश देतात हे आता पहावे लागेल.
भाजप कार्यकर्त्यांचा तक्रारीचा पाढा, मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय खासदाराला बावनकुळेंची समज
दरम्यान पत्रकारांशी बोलताना राजू पाटील यांनी सांगितले की ज्यांनी आमच्या पक्षाशी गद्दारी केली, त्या गद्दारांना आम्ही मदत करणार नाही. आमच्या भावना आम्ही राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवू, असे म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचे नाव घेता सुनावले. वैशाली दरेकर या मध्यंतरी मनसेत होत्या, परंतु त्यांनी शिवसेनेत घरवापसी केली.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

दरम्यान मनसे महायुतीत सहभागी होणार का? नऊ तारखेला गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार या प्रश्नावर पाटील म्हणाले की राजसाहेब काय बोलतील हे आमच्या शर्मिला वहिनी देखील सांगू शकत नाही, त्यामुळे आम्ही काय सांगणार? जे काही बोलायचं ते नऊ तारखेला बोलतील आणि ते महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या हिताचं बोलतील, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed