• Sat. Sep 21st, 2024

मुंबई पोलीस कर्मचाऱ्याची सुट्टी ठरली अखेरची, नाशिकमध्ये येताच अनर्थ अन् होत्याचं नव्हतं झालं

मुंबई पोलीस कर्मचाऱ्याची सुट्टी ठरली अखेरची, नाशिकमध्ये येताच अनर्थ अन् होत्याचं नव्हतं झालं

शुभम बोडके, नाशिक: शहरातील सिडको येथील माऊली लॉन्स जवळ आज (७ एप्रिल) रोजी सकाळी ११च्या सुमारास दुचाकी वाहन आणि एक अज्ञात वाहन यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात वाहन चालक धडक देऊन त्या ठिकाणाहून पळून गेला. मात्र एक वाहन चालक या धडकेत गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आले आहेत. जखमीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघाताना सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शिवशाही बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, दुर्घटनेत तिघांचा मृत्यू; रिक्षाचा चक्काचूर
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती ही मुंबई येथे नोकरीस आहे. सुट्ट्यामध्ये नाशिक येथे आल्याची माहिती मिळत आहे. मृत व्यक्ती हा पोलीस दलात कार्यरत होता. मुंबई पोलीस कर्मचारी हा या अपघातात जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त आहे. आज सकाळी सिडको येथील माऊली लॉन्स जवळ एक्टिवा दुचाकी गाडी आणि अज्ञात चारचाकी वाहनात जबरदस्त धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात मुंबई येथे नोकरीस असलेले पोलीस कर्मचारी नितीन सांगळे यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.हा अपघात एवढा भीषण होता की, ऍक्टिवा गाडीचा अक्षरश: चक्काचूर झालेला आहे. धडक दिलेले वाहन जागेवरून फरार झाल्याची प्राथमिक माहिती अपघात स्थळावरील प्रथम दर्शनी नागरिकांनी दिली आहे. अपघातात जखमी झालेले पोलीस कर्मचारी नितीन सांगळे यांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी लागलीच नाशिक शहरातील शासकीय जिल्हा रुग्णालयमध्ये उपचारासाठी दाखल केले असता जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

यंदा नारायण राणेंच्या पराभवाचा चौकार, तर कोल्हापुरात विष्णूचा १३ वा अवतारही पराभूत होईल : संजय राऊत

अपघातग्रस्त सांगळे यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. हा अपघात घडला यावेळी अपघातस्थळी बघ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलीस कर्मचारी हे अपघातस्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा करत पुढील तपास सुरू केला. अज्ञात वाहनाचा अंबड पोलीस शोध घेत असून परिसरातील CCTV च्या माध्यमातून फरार वाहन चालकाचा शोध घेत आहेत. अपघात कसा झाला याचा शोध घेऊन पुढील कार्यवाही अंबड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed