• Thu. Sep 3rd, 2026

Railway Horns:नव्या रेल्वे गाड्यांमध्ये समोरच्या बाजूस दोन हॉर्न असल्याने हॉर्नमध्ये ध्वनी नियंत्रण क्षमता नाही. त्यामुळे गाड्या कर्णकर्कश्श हॉन वाजवत जातात त्यामुळे गोरेगाव पूर्वेकडील परिसरात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.खास प्रतिनिधी,मुंबई :गोरेगाव पूर्वेकडील सेंट थॉमस हायस्कूल ते स्क्वाटर्स कॉलनी या रेल्वे रुळालगतच्या परिसरातील रहिवाशांना रेल्वे गाड्यांच्या कर्णकर्कश हॉर्नचा त्रास सहन करावा लागत आहे. या हॉर्नच्या आवाजापासून सुटका करण्यासाठी रेल्वे रुळालगत महापालिका हद्दीत ध्वनिरोधक (साउंड बॅरिअर) बसवावेत, अशी मागणी गोरेगाव प्रवासी नागरिक संघाने मुंबई महापालिकेकडे केली आहे. यासंदर्भात पत्रव्यवहार करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने संघाने नाराजी व्यक्त केली आहे.

गाड्या कर्णकर्कश हॉर्न वाजवत परिसरातून जातात

गोरेगाव पूर्वेतील सेंट थॉमस हायस्कूल ते स्क्वाटर्स कॉलनी हा परिसर रेल्वे रुळालगत आहे. पूर्वीच्या रेल्वे गाड्यांचे हॉर्न रुळांच्या दिशेने असत. मात्र, सध्या धावणाऱ्या नव्या गाड्यांमध्ये समोरच्या बाजूस दोन हॉर्न असतात. या हॉर्नमध्ये ध्वनी नियंत्रणाची यंत्रणा नसल्याने गाड्या कर्णकर्कश हॉर्न वाजवत या परिसरातून जातात, असा रहिवाशांचा दावा आहे.

नागरिकांना आवाजाचा त्रास

रेल्वे गाडी जात असताना निर्माण होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे रुळालगत असलेल्या शाळेतील शिक्षकांनाही गाडी पुढे जाईपर्यंत थांबावे लागते. तसेच रस्त्यालगतच्या इमारतींमध्ये राहणारे ज्येष्ठ नागरिक आणि अन्य रहिवाशांनाही या आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दुपारच्या आणि रात्रीच्या वेळी झोपणेही अवघड होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

Maharashtra TimesCrime News : बोरीवलीला जाणाऱ्या ट्रेनच्या महिला डब्यात भामटा घुसला, एकट्या विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न, धाडसी मुलीने डोळ्यात बोटं घालून रोखलं

गोरेगाव प्रवाशांची मागणी

रेल्वेच्या हॉर्नच्या त्रासापासून रहिवाशांना दिलासा मिळावा, यासाठी रेल्वे रुळालगत महापालिका हद्दीत ध्वनिरोधक बसवावेत, अशी मागणी करणारा ई-मेल मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पाठविल्याची माहिती गोरेगाव प्रवासी नागरिक संघाचे सचिव उदय चितळे यांनी दिली. हा ई-मेल महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनाही पाठविण्यात आला.

Maharashtra TimesNavi Mumbai Airport: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-१ टर्मिनलची दुरुस्ती ; महत्त्वाच्या विमानांची उड्डाणे नवी मुंबई विमानतळावरून , नागरिक त्रस्त

चितळे यांची मागणी

त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी तो महापालिका उपायुक्तांकडे पाठविल्याचे चितळे यांनी सांगितले. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या मागणीवर लवकरात लवकर कार्यवाही करून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी चितळे यांनी केली आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा