AI Fake Ticket scam :मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ११४०४ कोल्हापूर- नागपूर एक्सप्रेसमध्ये एआय तिकीटाचा बनाव उघडकीस आला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म.टा. प्रतिनिधी, नागपूर :कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून बनावट कागदपत्रे तयार करण्याचे प्रकार वाढत असतानाच आता रेल्वेच्या तिकीट व्यवस्थेलाही त्याचा फटका बसू लागला आहे. एआयच्या मदतीने यूटीएस ॲपवरील ऑनलाइन तिकिटासारखे दिसणारे बनावट तिकीट तयार करून प्रवास करणाऱ्या तरुणीसह तिघांना मध्य रेल्वेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. तिकीट निरीक्षकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासणी दरम्यान प्रकार उघडकीस
मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिकीट निरीक्षक हेमंत काळे हे सहकाऱ्यांसह गाडी क्रमांक ११४०४ कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासत होते. यावेळी त्यांनी दोन तरुण आणि एका तरुणीकडे तिकिटांची मागणी केली. तिघांनी मोबाइलमधील ‘माय फाइल’च्या डॉक्युमेंट फोल्डरमध्ये सेव्ह केलेले यूटीएसवरील ऑनलाइन तिकीट दाखवले.
तिकीट तीन क्रमांक एक
मात्र, तिघांच्या तिकिटांवर एकच यूटीएस क्रमांक असल्याचे काळे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी तिघांना यूटीएस ॲपमध्ये तिकीट दाखवण्यास सांगितले. परंतु, तिघांनाही ॲपवर तिकीट दाखवता आले नाही. त्यानंतर केलेल्या पडताळणीत त्यांनी दाखवलेले तिकीट बनावट असल्याचे स्पष्ट झाले. रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी एआयच्या मदतीने मूळ यूटीएस तिकिटासारखे दिसणारे बनावट तिकीट तयार केल्याचे समोर आले.
Navi Mumbai Airport: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-१ टर्मिनलची दुरुस्ती ; महत्त्वाच्या विमानांची उड्डाणे नवी मुंबई विमानतळावरून , नागरिक त्रस्त
पश्चिम रेल्वेवरही बनाव उघड
बनावट डिजिटल तिकिट किंवा पास तयार करण्याचा हा एकमेव प्रकार नाही. मध्य रेल्वेसोबतच पश्चिम रेल्वेवरही अशा पद्धतीने बनावट पास वापरल्याची प्रकरणे समोर आली आहेत. पश्चिम रेल्वेतील तिकीट परीक्षकांनाही अशा प्रकरणांत अनेक प्रवाशांना पकडले आहे.एआयची सहज उपलब्ध साधने वापरून अधिकृत तिकीट किंवा पासची हुबेहूब नक्कल तयार करणे सोपे होत असल्याने रेल्वे प्रशासनासमोर डिजिटल तिकीट पडताळणी अधिक सक्षम करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.
कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.
२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा