• Thu. Sep 3rd, 2026

Pune News: डीजेविरोधात रान पेटवणाऱ्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण; हल्लेखोरांना तुडवा म्हणत बापटांनी पोलिसांकडे काय मागणी केली?

पुणे: पुणे महापालिकेने गणेशोत्सवासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत डीजेविरोधात आवाज उठवल्याने चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याने त्यांना मारहाण केली असल्याचं सांगितलं जात असून एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असताना बापट यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यानंद बापट हे मागील काही दिवसांपासून पुण्यात गणेशोत्सव काळात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. डीजेच्या माध्यमातून उत्सवाचं विद्रुपीकरण होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचं सांगत डीजेवर बंदी घातली पाहिजे, अशी भूमिका ते मांडत आहेत. सर्वसामान्य पुणेकरांकडून बापट यांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला जात असताना काही गणेश मंडळांकडून मात्र विरोध केला जात आहे. अशातच आज विद्यानंद बापट हे एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असताना एक तरुण तिथे आला आणि त्यांना मारहाण केली. तिथं उपस्थित असलेल्या इतर लोकांनी हल्लेखोर तरुणाला वेळीच थांबवल्याने पुढील अनर्थ टळला. विशेष म्हणजे गणेश विसर्जन मिरवणुकीत ज्या टिळक रडत्यावर डीजेचा दणदणाट असतो त्याच टिळक रस्त्यावर त्यांना मारहाण झाली आहे.

हल्ल्यानंतर काय म्हणाले बापट?

तरुणाकडून झालेल्या मारहाणीनंतर विद्यानंद बापट यांनी कारवाईची मागणी केली आहे. “मी प्रतिक्रिया देत होतो तितक्यात एक वेडा तिथे आला आणि माझ्यावर हल्ला केला, कारण मी निशस्र होतो. त्याला फक्त सवंग प्रसिद्धी हवी होती. मी जसं म्हणतो घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् अगदी तसंच त्याने करण्याचा प्रयत्न केला. आता पोलिसांकडे सगळे फुटेज आहेत. त्यात पाहून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घ्यावं आणि तुडवून काढावं म्हणजे त्याला कळेल मुद्द्याचं उत्तर मुद्द्याने द्यायचं असतं, गुद्याने नाही, अशी प्रतिक्रिया या मारहाणीनंतर बापट यांनी दिली आहे

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेने गणेशोत्सवासंदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत डीजेविरोधात आवाज उठवल्याने विद्यानंद बापट यांना पोलीस संरक्षणात बाहेर काढण्यात आले होते. याबाबत पुणेकरांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. रविवारी पुणे शहरात ‘डीजे’विरोधी सभेचंही आयोजन करण्यात आलं होतं. सभेच्या संयोजकांनी माघार घेतल्यानंतरही शेकडो पुणेकरांनी रस्त्यावर येऊन ‘डीजे’ला आपला विरोध दर्शवला होता.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed