दरम्यान, हरिचंद्र चव्हाण हे दिंडोरी लोकसभेतून अपक्ष उमेदवारी करणार असल्याच्या चर्चा सुरू असताना आता महायुतीच्या उमेदवाराला हरिचंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीने मोठे आव्हान उभे राहणार आहेत. चव्हाण यांनी आज स्वामी शांतिगिरी महाराज यांची भेट घेऊन अपक्ष उमेदवारी करणार याचे स्पष्ट संकेत दिले आहे. त्यामुळे आता महायुतीच्या उमेदवाराला कडव आव्हान देण्यासाठी हरिश्चंद्र चव्हाण हे अपक्ष उमेदवारी करतील अशी चर्चा सुरू झाली आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघातील पेठ, कळवण, सुरगाणा, देवळा या भागात हरिचंद्र चव्हाण यांची मोठी ताकद समजली जाते. चव्हाण हे तिसऱ्यांदा भाजपचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यामुळे हरिचंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीना महायुतीच्या उमेदवाराला फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपची ताकद दिंडोरी लोकसभेत आहेत त्यामध्ये हरिचंद्र चव्हाण यांच्या पक्ष संघटनेचा देखील मोठा वाटा आहेत. त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण यांनी आज स्वामी शांतिगिरी महाराज यांची भेट घेतल्याने दिंडोरीत स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या जय बाबाजी भक्त परिवाराचा पाठिंबा मिळावा यासाठी ही भेट असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मागील आठवड्यात मंत्री भारती पवार यांनी देखील स्वामी शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली होती. दिंडोरी लोकसभेत जय बाबाजी भक्त परिवाराचा पाठिंबा मिळावा यासाठी भारती पवार यांनी शांतिगिरी महाराज यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतल्याचा देखील सांगितलं होतं.
नाशिक लोकसभेतून इच्छुक असलेल्या स्वामी शांतिगिरी महाराज यांना महायुतीने उमेदवारी न दिल्यामुळे शांतिगिरी महाराज हे भाजपवर नाराज असल्याचे देखील बोललं जात आहे. त्यामुळे महायुतीच्या विरोधात स्वामी शांतिगिरी महाराज हे राजकीय बळ उभे करणार अशी देखील चर्चा आता सुरू आहेत. त्यामुळे हरिचंद्र चव्हाण यांना स्वामी शांतिगिरी महाराज हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पाठिंबा देतील असा अंदाज वर्तवला जात आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात स्वामी शांतिगिरी महाराज यांचा जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या प्रमाणात आहेत.
निफाड, मनमाड, येवला या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांमध्ये जय बाबाजी भक्त परिवार हरिचंद्र चव्हाण यांच्या बाजूने उभे राहिल्यास महायुतीच्या उमेदवाराची मतदानाची आकडेवारी ही नक्कीच कमी होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिंडोरी, पेठ,कळवण, चांदवड या तालुक्यातून सर्वाधिक पाठिंबा मिळू शकतो तर निफाड, येवला,मनमाड या तालुक्यांमधून महायुतीला सर्वाधिक मतदान होऊ शकते असा राजकीय अंदाज व्यक्त केला जातो आहे.
त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा मतदानाचा टक्का सर्वाधिक असलेल्या तालुक्यांमध्ये जय बाबाजी भक्त परिवार देखील मोठ्या संख्येने असून स्वामी शांतिगिरी महाराज हे जय बाबाजी भक्त परिवाराची ताकद ही अपक्ष उमेदवारी करणाऱ्या हरिचंद्र चव्हाण यांच्या बाजूने उभी करू शकतील अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपच्या बंडखोर उमेदवारांचा फटका हा महायुतीच्या उमेदवाराला बसतो का हे बघ ना आता महत्त्वाचं असणार आहे. हरिश्चंद्र चव्हाण यांची नाराजी भाजप दूर करण्यास यशस्वी ठरणार का? हे देखील बघ ना आता महत्त्वाचं ठरणार आहे. हरिचंद्र चव्हाण यांनी दिंडोरी लोकसभेतून अपक्ष उमेदवारी केल्यास महायुतीच्या उमेदवाराला चव्हाण यांच्या बंडखोरीने ग्रहण लागण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.