• Sat. Sep 21st, 2024
आढळराव पाटलांना विरोध, अतुल देशमुखांची भाजपला सोडचिठ्ठी, नव्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

पुणे: शिरूर लोकसभा दिवसेंदिवस चांगलीच चर्चेत येत आहे. शिंदे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आढळराव पाटील यांनी प्रवेश केला. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना महायुतीचे उमेदवार म्हणून देण्यात आले आहे. मात्र आता आढळराव पाटील यांच्या उमेदवारीमुळे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत भाजपच्या.कार्यकर्त्यानी थेट नाराजी व्यक्त केली आहे. खेड आळंदी विधानसभेचे भाजप समन्वयक अतुल देशमुख यांनी थेट राजीनामा देत आढळराव यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन मी बाहेर पडतो आहे, अशी भूमिका थेट देशमुख यांनी घेतली आहे.
दिंडोरीत महायुतीच्या उमेदवाराला बंडाचे ग्रहण; माजी खासदार अपक्ष निवडणूक लढणार? भारती पवारांचं टेन्शन वाढलं
आढळराव पाटील यांच्या उमेदवारीवरून स्थनिक नेत्यांत नाराजी होतीच. मात्र आता थेट भाजपचे कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असल्याने भाजपचे वरिष्ठ नेते याबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. मी भाजपमधून बाहेर पडणार असल्याचे थेट त्यांनी राजीनामा देत सांगितले आहे. भाजपने विकासाबाबत विश्वासात घेतलेले नाही. आणि भाजप ताकद देत नसल्याने मी बाहेर पडत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. लोकसभेच्या निमित्ताने आज झालेल्या महायुतीच्या जाहीर मेळाव्याला अतुल देशमुख गैरहजर राहिले होते.

फडणवीसांनी उमेदवारी जाहीर केली, श्रीकांत शिंदे धनुष्यबाणावर लढणार की कमळावर? | वैशाली दरेकर

अतुल देशमुख हे उत्तर पुणे जिल्ह्यात भाजपाचे मोठे नेतृत्व आहे. ज्या पक्षात काम करतो तेच आपला विचार करत नसल्याची खंत व्यक्त करत देशमुखांची नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे देशमुख भाजपातून बाहेर पडल्यानंतर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे बोलले जात आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत होत आहे. आढळराव पाटलांना निवडून आणण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केला जात आहे. अजितदादांनी अमोल कोल्हे यांना पाडण्याचा चंग बांधल्यानंतर आता भाजपकडून उघडपणे आढळराव पाटील यांच्या उमेदवारीला नाराजी दर्शवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मात्र भाजपकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed