• Sat. Sep 21st, 2024
१० वर्षांनी मोदी चंद्रपुरात, अहिरांप्रमाणे मुनगंटीवारांसाठीही लकी ठरणार का, सभा वारे बदलवणार?

चंद्रपूर: तब्बल दहा वर्षांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपुरात येत आहेत. मोदींची सभा चंद्रपूर भाजपसाठी नेहमीच लकी ठरली आहे. २०१४ च्या लोकसभेचे भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा चंद्रपुरात झाली होती. तेव्हा मोठ्या मताधिक्याने हंसराज अहिर यांचा विजय झाला होता. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मोदी आले नाहीत आणि या निवडणुकीत अहिर यांना पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ प्रमाणे आता भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदी लकी ठरतील काय? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडे गेला. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या दिवंगत बाळू धानोरकर यांनी भाजपचे दिग्गज नेते तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला होता. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला.
कोण ते घड्याळवाले… अजित पवार, जागावाटपावर बोलताना संजय राऊतांकडून खिल्ली
या मतदारसंघावर भाजपने आपले लक्ष केंद्रित केले आहे. ओबीसी चेहऱ्यांची शोधाशोध केली. शेवटी दिल्लीत जाण्यास इच्छुक नसलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने मैदानात उतरविले आहे. मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी सोमवार ८ एप्रिलला नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. मोदी यांची सभा चंद्रपूर भाजपसाठी लकी ठरली आहे. मुनगंटीवारांसाठी ही सभा फार महत्वाची असणार आहे. मोदी पुन्हा एकदा चंद्रपूर भाजपसाठी लकी ठरतील काय? हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मोदींची सभा, अहिर यांचा विजय

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती.देश्यातील प्रत्येक मतदारसंघावर मोदी लाटेचा प्रभाव दिसला. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघ ही या प्रभावातून सुटला नाही. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार हंसराज अहिर होते. तर, काँग्रेसने संजय देवतळे यांना उमेदवारी दिली होती. देवतळे राज्यात सांस्कृतिक आणि चंद्रपूरचे पालकमंत्री होते. त्यामुळे ही लढत टोकाची होईल अशी चर्चा होती.

मी रडणारी नाही लढणारी; लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची ताकद ठेवते; प्रतिभा धानोरकर गरजल्या

अहिर यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची सभा शहरातील चांदा क्लब ग्राउंडवर झाली होती. या सभेला मोठी गर्दी उसळली होती. अहिराना ३०१४६७ मते मिळाली होती. ३२४९५ मतांनी देवतळे यांचा पराभव झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed