• Mon. Nov 25th, 2024
    मोठी बातमी! इंदापुरात शरद पवारांना मोठा धक्का, निकटवर्तीय अजितदादा गटात

    बारामती : होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात मागील काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी घडत असून, वेळोवेळी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. काल-परवापर्यंत खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणारे प्रवीण माने यांनी आज पत्रकार परिषद घेत अजित पवारांना साथ देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.सोनाई दूध डेअरीच्या माध्यमातून दशरथ माने आणि त्यांचे पुत्र प्रवीण माने यांनी इंदापूर तालुक्यातील अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये माने यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. प्रवीण माने हे काल-परवापर्यंत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होते. मात्र, अचानक त्यांनी पत्रकार परिषदेत घेत आपली भूमिका बदलत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ देत सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
    कोण ते घड्याळवाले… अजित पवार, जागावाटपावर बोलताना संजय राऊतांकडून खिल्ली
    दोन दिवसांपूर्वी इंदापूर शहरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी इंदापुरात दाखल झालेले उपमुख्यमंत्री फडणवीस हे थेट प्रवीण माने यांच्या निवासस्थानी दाखल होत त्यांनी चहापान घेतला. मात्र, माने यांनी व्यासपीठावर येण्याचे टाळल्याचे वेळी पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

    बाळासाहेब ठाकरेंकडून स्वाभिमान शिकलो, मी घाबरणार नाही; शरद पवार गटाच्या बाळ्या मामांचा भाजपला इशारा

    काय म्हणाले प्रवीण माने?

    बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय होऊन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी मी अजित दादांना साथ देणार असल्याचे प्रवीण माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.आम्ही ठामपणे अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असून, आजपासूनच प्रचार सुरू करत आहोत. अजित पवार हे विकासासाठी भाजपबरोबर गेले आहेत. आम्ही विकास व्हावा यासाठी अजितदादा यांच्याबरोबर जात आहोत. अजितदादांनी अनेक महत्त्वपूर्ण विकास कामं केली आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *