• Sat. Sep 21st, 2024
महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे रेबीज लसीकरण मोहीम, वीस हजारांवर कुत्रांना रेबीज लस

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने रेबीज लसीकरण मोहीम राबवली होती. या मोहीमेदरम्यान शहर व परिसरातील वीस हजारांवर कुत्र्यांना रेबीज लस टोचण्यात आली. रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांनादेखील लस देण्यात आली आहे.शहरात मोकाट कुत्रांची मोठी दहशत आहे. पन्नास हजारांपेक्षा जास्त मोकाट कुत्री असावीत असा अंदाज पालिकेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. मोकाट कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी होण्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार केली जाते. सर्वसमान्य नागरिकांकडून अशा प्रकारची मागणी तर होतच असते पण पालिकेत जेव्हा नगरसेवक कार्यरत होते, तेव्हा नगरसेवकांकडूनदेखील अशा प्रकारची मागणी स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून केली जात होती, परंतु कुत्र्यांवर ठोस अशी कोणताही कारवाई होत नव्हती.
राधाकृष्ण विखेंनी माझ्या शिर्डीतल्या उमेदवारीला विरोध केला, फडणवीसांना पत्र लिहिलं, रामदास आठवले यांचा ‘मटा कॅफे’मध्ये गौप्यस्फोट
मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यासाठी पालिकेने खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेकडून दिवसाकाठी पंधरा ते वीस कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली जाते, परंतु मोकाट कुत्र्यांची संख्या लक्षात घेता हे प्रमाण फारच कमी असल्याचे मानले जाते. त्यातच महापालिकेने नऊ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान रेबीज लसीकरण मोहीम राबवली. या मोहीमेसाठी पंचेवीस वाहने उपलब्ध करुन देण्यात आली ,शिवाय प्रत्येक वाहनासोबत प्रशिक्षित डॉक्टर देखील देण्यात आला. महिनाभराच्या काळात वीस हजार १२५ कुत्र्यांना रेबीज लस देण्यात आली. त्यात १३ हजार ४९५ कुत्रे तर ६६३० कुत्रींचा समावेश होता अशी माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed