• Mon. Nov 25th, 2024
    वर्ध्यातून काँग्रेस हद्दपार; आम्हाला जे जमलं नाही ते पवारांनी करुन दाखवलं, फडणवीसांचा टोला

    म. टा. वृत्तसेवा,यामिनी सप्रे, वर्धा: ‘आम्ही जिल्हा परिषद जिंकली. नगरपरिषदा जिंकल्या. एक सोडून सर्व विधानसभांमध्ये विजय मिळविला. काँग्रेसमुक्त वर्धाचा नारा दिला. तरीही पंजा गायब करता आला नाही. आम्हाला इतक्या वर्षांत जमले नाही ते शरद पवार यांनी या लोकसभा निवडणुकीत करून दाखविले. वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार केले,’ असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

    वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल करण्यात आला. तत्पूर्वी वर्ध्यातील स्वाध्याय मंदिरात सभा झाली. यात मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते. ‘कुस्तिगीर परिषद आजवर शरद पवार यांच्या ताब्यात होती. पैलवान असलेले रामदास तडस यांनी डाव टाकला. पवारांच्या हातातून कुस्तिगीर परिषद हिसकावली. हेच शरद पवार काल वर्ध्यात येऊन गेले. त्यांच्या पक्षाकडून कुणी उभे राहायला तयार नव्हते. शेवटी काँग्रेसच्या माजी आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिले,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
    महायुतीची सावध पावलं, जाहीर उमेदवारांची अदलाबदल; तर भावना गवळी बंडखोरीच्या पवित्र्यात
    सभेनंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपचे कार्यकर्ते सभागी झाले होते. शहरातील विविध मार्गांनी ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पोहचली. रॅलीमधून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न झाला.

    ‘संविधानाला धक्का लागणार नाही’

    संविधान बदलणार अशी अफवा विरोधी पक्ष पसरवित आहेत. पण, मी तुम्हाला वचन देतो संविधानाला धक्काही लागणार नाही. त्याचा पूर्ण आदर भारतीय जनता पक्ष नेहमीच करत आला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल करण्यात आला. यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत फडणवीस सहभागी झाले होते. यात नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढले.

    अंबादास दानवेंच्या भाजपच्या प्रवेशाच्या बातम्या पेरल्या; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला

    भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली. त्यामुळे ही निवडणूक फक्त तुमच्या मतदारसंघातील खासदाराची नसून नरेंद्र मोदी यांची आहे असे समजून मतदान करा. मागील दहा वर्षांत तुम्ही ट्रेलर बघितला, त्याचा पिक्चर पुढल्या पाच वर्षांत दिसेल.’ भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना खासदार म्हणून पाठवू नका, असेही आवाहनही फडणवीस यांनी केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *