• Mon. Sep 7th, 2026
नवनीत राणा यांना ‘सुप्रीम’ दिलासा, जात प्रमाणपत्र वैध, निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

अमरावती : अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि महायुतीच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलं आहे. राणांच्या जातीचा दाखला बनावट ठरवून तो रद्द करण्याचा मुंबई हायकोर्टाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नवनीत राणा यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed