• Mon. Nov 25th, 2024

    खासगी बसचा भीषण अपघात, दीड महिन्याच्या बाळासह तिघांचा दुर्दैवी अंत

    खासगी बसचा भीषण अपघात, दीड महिन्याच्या बाळासह तिघांचा दुर्दैवी अंत

    नागिंद मोरे, धुळे : राजस्थानातून हैद्राबादकडे जाणारी बस उलटून झालेल्या अपघातात मायलेकासह तीन जण ठार, तर १९ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये एका दीड महिन्याच्या बालकाचाही समावेश आहे. हा भीषण अपघात चौगाव गावाजवळील खंडेराव बारीत बुधवारी दुपारच्या सुमारास झाला.

    या अपघातात पूजा (वय ३२), तिचं दीड महिन्याचं बाळ आणि चालकाचा मृत्यू झाला आहे. राजस्थानहून हैद्राबादच्या दिशेने खासगी बस (अेआर ११-बी ५८५१) जात होती. या बसमध्ये जवळपास ३० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. बसचा वेग जास्त असल्याने, चालकाचे नियंत्रण सुटलं आणि बस धुळे तालुक्यातील चौगाव गावाजवळ रस्त्याच्या बाजूला पलटी होऊन हा अपघात घडला.
    खोटं प्रसिद्ध करून माझं चारित्र्यहनन करण्याचा भाजप प्रयत्न करेल, प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल
    बुधवारी दुपारी झालेल्या या भीषण अपघातात गोविंदसिंग (१८), टोकसिंग (१८), रमेशकुमार (३२), भरतसिंग (४३), महेशकुमार (७), नीलेशकुमार (६), गुड्डीदेवी (३५), हॅपीसिंग (२२), महावीरकुमार (२२), सुरेशसिंग (२६), शुभम (८), सागवीचेतन (६), मोहलदेवी (६), मोतीसिंग (२१), हरीश तेवासी (१८), मनोहरसिंग (२०), प्रकाशसिंग (१८), अनुपसिंग (३०), जिताराम (२७) हे जखमी झाले असून सर्वांना धुळे जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर पुढील उपचार सुरू केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
    परभणीतून अर्ज भरणाऱ्या ‘फकीर’ महादेव जानकर यांची संपत्ती किती? शपथपत्रांमधून माहिती समोर
    अपघाताची माहिती मिळताच १०८ रूग्णवाहिकेचे उपजिल्हा व्यवस्थापक जयेश पाटील घटनास्थळी पोहचले. १०८ रूग्णवाहिकेद्वारे त्यांना जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिस घटनास्थळी तात्काळ पोहचले. अपघातामुळे कुसुंबा-मालेगाव रोडवर वाहतूक ठप्प झाली होती.

    ‘हिट अँड रन’चा नवा कायदा आला तर देशात ट्रक चालकच शिल्लक राहणार नाहीत; चालकांनी मांडल्या व्यथा

    क्रेनच्या साहाय्याने बस उचलण्यात येत असतानाचा क्रेन चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रेन देखील पलटी झाली. मात्र सुदैवाने क्रेनच्या चालकाने प्रसंगावधान साधत क्रेनमधून उडी घेतल्याने त्याचे प्राण वाचले. मात्र सायंकाळी उशीरापर्यंत धुळे तालुका पोलिसात अपघाताची नोंद झालेली नव्हती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *