• Sat. Sep 21st, 2024
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी, ज्योती मेटे ‘सिल्व्हर ओक’ला, पाच लोकसभा उमेदवार कोण?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे उर्वरित लोकसभा उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे. पवार गटाची दुसरी यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज जाहीर करण्याची चिन्हं आहेत. शिवसंग्राम नेत्या आणि दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक येथील निवासस्थानी पोहोचल्या आहेत. पवार गटाच्या लोकसभा उमेदवार यादीतील काही संभाव्य नावं समोर आली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज शरद पवारांशी सिल्वर ओक येथे चर्चा करत आहेत. लोकसभा उमेदवारांच्या नावांची अंतिम यादी तयार करून दुपारी पत्रकार परिषद घेत ते या संदर्भात जाहीर घोषणा करतील. आतापर्यंत पवारांनी पाच उमेदवार जाहीर केले आहेत. आज आणखी पाच जणांची घोषणा झाल्यास हा आकडा दहावर जाईल.

अटीतटीच्या लढती पाहता साताऱ्यातून पुन्हा एकदा पवार गटातील विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून परत लढण्याचा आग्रह त्यांना करण्यात येत आहे. याशिवाय काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचंही नाव चर्चेत आहे.

बीड आणि माढ्यातून अजित पवार गटातून परतलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील, तर बीडमधून बजरंग सोनवणे यांच्यासह ज्योती मेटे यांचं नावही चर्चेत आहे. भिवंडीत काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु होती. अखेर राजकीय उड्यांसाठी प्रसिद्ध असलेले ‘जम्पिंग जॅक’ नेते सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना तिकीट मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
किरणभैयांची भावनेच्या भरात ‘माघार’ पोस्ट, समजुतीनंतर डिलीट; रत्नागिरीवर शिवसेनेचा दावा काय, उदय सामंत ठाम

राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार

माढा – धैर्यशील मोहिते पाटील
बीड – बजरंग बाप्पा सोनावणे /ज्योती मेटे
भिवंडी – सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे
सातारा – श्रीनिवास पाटील/ पृथ्वीराज चव्हाण
रावेर – विनोद सोनावणे/ रवींद्र भैय्या पाटील
भाजप आमदाराची पत्नी राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात? पतीच्या पराभवाचा वचपा काढण्यास उत्सुकRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार

बारामती – सुप्रिया सुळे
शिरूर – अमोल कोल्हे
अहमदनगर – निलेश लंके
दिंडोरी – भास्करराव भगरे
वर्धा – अमर काळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed