• Sat. Sep 21st, 2024

आश्रमशाळेचे दोन मुख्याध्यापक ACBच्या जाळ्यात; पगाराची बिल मंजूरीसाठी मागितलेली लाच

आश्रमशाळेचे दोन मुख्याध्यापक ACBच्या जाळ्यात; पगाराची बिल मंजूरीसाठी मागितलेली लाच

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : बिल मंजूर करून पगार काढण्यासाठी लाच घेणाऱ्या आश्रमशाळेच्या दोन मुख्याध्यापकांना रंगेहात अटक करण्यात आली. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी कोंढाळीतील मसाळा येथे केलेल्या या कारवामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मसाळा येथील गजबे माध्यमिक आश्रम शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आनंदराव तुकाराम येसनसुरे, (वय ४५, रा. वायुसेनानगर, दाभा) व आदिवासी गोवारी शहीद स्मृति प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकुमार महादेवराव भादे (वय ५६, रा. शिक्षक कॉलनी, कोंढाळी), अशी अटकेतील मुख्याध्यापकांची नावे आहेत. २४ वर्षीय सेवकाच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार हा मसाळा येथील आदिवासी गोवारी शहीद स्मृति प्राथमिक आश्रम शाळेत सेवक आहे. त्याचा पगार मिळाला नाही. बिल काढून पगार मंजूर करण्यासाठी येसनसुरे यांनी तक्रारदाराला २ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने भादे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही २ हजार रुपये देण्यास सांगितले. सेवकाने एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले. येसनसुरे यांनी, १५०० रुपये दिल्याशिवाय काम होणार नाही, असे सांगितले.
पुणे विद्यापीठाच्या ‘पीएचडी’ मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण, लाच घेणाऱ्या गाईडवर कारवाई
मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने सेवकाने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधीक्षक राहुल माकणीकर, अपर अधीक्षक संजय पुरंदरे, सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शिवशंकर खेडेकर, उज्ज्वला मडावी, हेडकॉन्स्टेबल पंकज घोडके, अमोल मेंघरे, प्रफुल्ल बांगडे, प्रिया नेवरे यांनी मसाळा येथे सापळा रचला. दीड हजार रुपयांची लाच घेताच पोलिसांनी आधी येसनसुरे व नंतर भादे यांना अटक केली. कोंढाळी पोलिस ठाण्यात या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed