• Mon. Nov 25th, 2024

    परभणीतून अर्ज भरणाऱ्या ‘फकीर’ महादेव जानकर यांची संपत्ती किती? शपथपत्रांमधून माहिती समोर

    परभणीतून अर्ज भरणाऱ्या ‘फकीर’ महादेव जानकर यांची संपत्ती किती? शपथपत्रांमधून माहिती समोर

    धनाजी चव्हाण, परभणी : महादेव जानकर मूळचे पळसवाडी जिल्हा सातारा येथील रहिवासी असून त्यांनी वालचंद कॉलेज सांगली येथून डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली आहे. जानकर यांनी शपथपत्रात आपला व्यवसाय शेती हा दर्शवला आहे. जानकरांच्या नावावर अठरा एकर १४ गुंठे एवढी शेती असून त्यांच्याकडे चल आणि अचल दोन्ही मिळून जवळपास पाच कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे माहिती आपल्या शपथपत्रात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे स्वतःला फकीर म्हणणाऱ्या महादेव जानकर यांच्याकडे कोट्यवधी रुपयाची संपत्ती असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

    महादेव जानकर यांनी आपला निवडणूक अर्ज भरताना जे ऍफिडेविट दिलं आहे, त्यामध्ये त्यांनी आपलं उत्पन्न दर्शवलं आहे. २०२२-२३ रोजी त्यांचं उत्पन्न ४० लाख १९ हजार ९९० एवढे आहे. तर २०२१-२२ मध्ये ३१ लाख ३८ हजार ४० रुपये, २०२०-२१ मध्ये २७ लाख ४० हजार ७५० रुपये, तर २०१९-२० मध्ये ३१ लाख ७७ हजार ९४२ रुपये आणि २०१८-१९ मध्ये २६ लाख २६ हजार ६३९ रुपये इतकं उत्पन्न दर्शवण्यात आलं आहे.
    आईसारख्या असतील तर आशीर्वाद द्या आणि बाजूला व्हा; दीपक मानकरांचा सुप्रिया सुळेंना सल्ला
    महादेव जानकर यांच्याकडे चलसंपत्ती १ कोटी २५ लाख, १० हजार ५९८ रुपये एवढी आहे. यामध्ये त्यांच्याकडे कॅश इन हॅन्ड २७ हजार ३३० रुपये आहेत. तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ५१ लाख ६६ हजार ७७९ रुपयांची एफडीआर करण्यात आला आहे. त्याचबरोबर गोल्ड बॉंड स्कीममध्ये ७९१ ग्रॅम सोन्यात गुंतवणूक केली, असून त्याचे मूल्य २९ लाख ९६ हजार ३००८ रुपये एवढे आहे.

    जानकर यांनी पीपीएफ खात्यात २०१९-२० साठी दीड लाख रुपये, तर मार्च २०२४ मध्ये २ लाख २५ हजार ८४५ रुपये आहेत. जानकरांकडे २०० ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने असून त्याचं बाजारमूल्य १३ लाख ६५ हजार इतकं आहे. सर्व अचल संपत्ती १ कोटी २५ लाख १० हजार ५९८ रुपये आहे.
    मला फक्त तिला भेटायचंय! स्वीडनहून लेक नागपुरात, जन्मदात्रीला शोधण्यासाठी वणवण; माय-लेकीची कहाणी ऐकून डोळ्यात येईल पाणी
    त्याचप्रमाणे महादेव जानकर यांच्याकडे अचल संपत्ती देखील ३ कोटी ६२ लाख ९९ हजार ७६० रुपये इतक्या किमतीची असल्याचं त्यांनी आपल्या घोषणा पत्रात सांगितलं आहे. त्यामध्ये महादेव जानकर यांच्याकडे शेत जमीन, रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी आणि कमर्शियल प्रॉपर्टी याचा समावेश आहे. जाणकारांची शेतजमीन सातारा, छत्रपती संभाजी नगर, पुणे, सोलापूर, बीड, सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणी आहे. तर अ कृषिक जमीन हे सोलापूर, जालना या जिल्ह्यात आहेत. जानकरांच्या कमर्शियल आणि रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी देखील आहेत. त्या रायगड, पुणे, अहमदनगर, मुंबई या ठिकाणी आहेत. जानकरांची चल आणि अचल दोन्ही संपत्ती मिळून जवळपास त्याचे बाजार मूल्य पाच कोटी रुपयांचं होत आहे.
    भाजपने उत्तर प्रदेशला मुख्तार अन्सारीपासून मुक्ती दिली! अमित शाह यांच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?
    महादेव जानकर यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल नाहीत. त्यांच्यावर केवळ एकच गुन्हा दाखल आहे, तोही शासकीय अधिकाऱ्यांनी भाषण केल्याबद्दल केलेला आहे. त्यामुळे जानकर यांचं चारित्र्य शुद्ध असून, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा दाखल नाही. त्यांच्यावर गंभीर गुन्हे नसून कोणत्याही प्रकारचं कर्ज नसल्याचं या शपथपत्रात नमूद करण्यात आलं आहे. महादेव जानकर यांना महाराष्ट्र शासनाकडून मुक्तगिरी बंगला मलबार हिल इथे तर आकाशवाणी आमदार निवासमध्ये एक रूम देखील देण्यात आला आहे.

    जानकरांनी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांना फकीराची उपमा दिली होती. महादेव जानकर यांना कोठेच घरदार नाही, ते रेल्वे स्टेशनवरही झोपू शकतात असं ते म्हणाले होते. पण प्रत्यक्षात ते काही खरे नाही, कारण जानकरांकडे कोट्यवधी रुपयाची संपत्ती असल्याचं त्यांच्या शपथपत्रातून समोर आलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *