• Sat. Sep 21st, 2024
किरण सामंतांसाठी CM शिंदेंचे प्रयत्न पण BJP ने जागा खेचली, राणेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : नारायण राणे यांची सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेसाठी उमेदवारी पक्की झाल्याचे वृत्त आहे. मी हायकमांडने दिलेला मेसेज उघडपणे सांगणार नाही. पण वरून आदेश आला तर लढायला तयार आहे, असे सांगत राणे यांनी निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.

नारायण राणे यांना भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचाराला कामाला लागण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहेत. नारायण राणे आज रात्री सिंधुदुर्गामध्ये दाखल होणार आहेत. गोवा मोपा एअरपोर्टवर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर राणे जिल्ह्यात दोनशे ते तीनशे गाड्यांच्या ताफ्यासह जोरदार शक्ती प्रदर्शन करत सिंधुदुर्गात दाखल होणार आहेत. त्यानंतर राणे हे भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारांच्याही गाठीभेटी घेणार आहेत.
‘वर्षा’वर अडीच तास खलबतं, तीन जागांवरुन सेना-भाजपची रस्सीखेच, उदय सामंतांचे भावासाठी प्रयत्न

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांचं व्हाट्सअप स्टेटस ठेवून उमेदवारी पक्की केलेली आहे. “आपलं ठरलंय नारायण राणे, आपला माणूस, आपला खासदार” अशा आशयाचे स्टेटस ठेवून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारी संकेत दिले आहेत.
रत्नागिरी देतो, पण ठाणे किंवा कल्याण हवं; भाजपची शिंदेंना अट? होमग्राऊण्ड देणार की लेकाची सीट?

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेची जागा सध्या शिवसेनेकडे आहे, होती आणि राहील, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केलाय. ही जागा आम्ही अडीच लाख मतांनी जिंकू, असा विश्वास देखील उदय सामंत व्यक्त केलाय. लवकरच जागा वाटप होईल व यादी जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले. पण त्यांच्या याच विधानावर राणे यांनी टीका केली. कुणीही लुडबुड करू नये, ही जागा आम्हीच लढू, असा पलटवार राणेंनी केली.

तुम्हीही माझ्याविरोधात निवडणूक लढवू शकता, पंकजा मुंडे पत्रकारांना असं का म्हणाल्या?

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यावेळेस सर्वांनीच ताकद लावली आहे. ही जागा मिळावी म्हणून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. मात्र भाजपकडून या जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपच्या पक्ष नेतृत्वाने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.अजूनही जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने त्यांचीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed