• Mon. Nov 25th, 2024
    परभणीत दिल मिल गये! अजितदादांच्या कोट्यातून उमेदवारी अर्ज, महादेव जानकरांचं शक्तिप्रदर्शन

    धनाजी चव्हाण, परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री बबनराव लोणीकर, आमदार मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, शिवसेनेचे माजी खासदार सुरेश जाधव हे प्रमुख नेते उपस्थित होते.

    मुंबई येथे महायुतीची लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला महादेव जानकर यांनी हजेरी लावल्यामुळे त्यांनी घेतलेल्या यूटर्नची चर्चा रंगली होती. छोट्या पक्षांना भाजप संपवतं अशी टीका यापूर्वी जानकरांनी केली होती. मात्र, मी महायुतीसोबत आहे. जागेचा तिढा सुटत नव्हता म्हणून इकडे तिकडे होतो असं जानकर म्हणाले.
    येऊदे कितीबी… पवारांचा कॉलर उडवतानाचा व्हिडिओ, सुप्रिया सुळेंच्या WhatsApp स्टेटसची चर्चा
    जानकरांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा सुटली आहे. जानकरांचं महाराष्ट्रातील योगदान पाहता त्यांना उमेदवारी दिल्याचं प्रदेशाध्य सुनील तटकरे यांनी सांगितलं.
    शिंदेंच्या हातून नाशिक निसटलं? जागा दादांना फिक्स, धाराशिवलाही राष्ट्रवादीचा उमेदवार फायनल
    परभणी लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला सुटला आहे. असे असले तरी या लोकसभा मतदारसंघात भाजपची बूथनिहाय ताकद आहे, त्यामुळे महादेव जानकर हे मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.
    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने महादेव जानकर यांना उमेदवारी मिळाली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात भाजपची प्रचंड ताकद आहे मी माझ्या जिंतूर सेलू मतदारसंघातून पन्नास हजाराची लीड देणार असल्याचे भाजप आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *