• Mon. Nov 25th, 2024
    पैशावरुन वाद, घरात येऊन मारहाण, नंतर तरुणावर गोळीबार, नेमकं काय घडलं?

    नागपूर: उधारीच्या पैशावरून एका तरुणाच्या घरात शिरून त्याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात शेख वसीम उर्फ भुऱ्या शारिक खान आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट २च्या पथकाने दोघांना अटक केली आहे. मीर सैफ अली मीर अख्तर अली सय्यद (२६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
    प्रशिक्षण केंद्रातील ६० हून अधिक महिला पोलिसांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू
    मिळालेल्या माहितीनुसार, नितीन उर्फ मुन्ना गणेश पिल्ले (३३), मोहसिन खान उर्फ भुऱ्या शारीक खान (३५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मीर सैफ हा प्रॉपर्टी डिलरचे काम करतो. त्याने चिऱ्याकडून एक लाख उधार घेतले होते. २१ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजताच्या सुमारास शेख वसीम उर्फ चिऱ्या त्याचे साथीदार, मोहसिन खान उर्फ भुऱ्या, फैजान खान, मोहम्मद अलीम मोहम्मद शरीफ, नितीन पिल्ले उर्फ मन्ना यांच्या सोबत मीर यांच्या घरी गेला. तेथे पैशावरून वाद झाला. आरोपींनी त्याला मारहाण केली. त्यानंतर पिस्टल काढून त्याच्यावर गोळीसुद्धा झाडली.

    विजय करंजकरांच्या नाराजीवर काय म्हणाले राजाभाऊ वाजे?

    सुदैवाने मीर सैफ बाजूला सरकल्याने ती गोळी बाजूच्या पिल्लरला लागली. गोळीच्या आवाजाने घरातील मंडळी जागी झाले. ते ओरडल्याने आरोपी अॅक्टीवा गाडी आणि ऑटोने तेथून पळून गेले. या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकूंद ठाकरे यांच्या नेतृत्त्वात पोलीस उपनिरीक्षक मधुकर काठोके यांच्या पथकाने नितीन आणि मोहसिन खान यांना गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेत लकडगंज पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *