• Mon. Nov 25th, 2024
    संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा निर्णायक, सावे-कराड फडणवीसांच्या भेटीला, बैठकीत फैसला होणार

    भरत मोहोळकर, छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यातच छत्रपती संभाजीनगर जागेवर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अतुल सावे आणि भागवत कराड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

    छत्रपती संभाजीनगरची जागा ही शिवसेनेची पारंपारिक जागा असल्याने ती आम्हाला सोडण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून मंत्री भागवत कराड आणि अतुल सावे यांनी दावा केला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा कायम आहे.
    आपल्या जीवन मरणाची निवडणूक, तुम्ही स्वत: उमेदवार म्हणून प्रचार करा, नीलेश लंकेंनी विखेंविरोधात वात पेटवली
    आतापर्यंत भाजपने २४ तर शिवसेनेने जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भागवत कराड आणि अतुल सावे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री बैठक होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली.
    मुलाआधी विखे पाटलांनी सुरू केला सेनेच्या सदाशिव लोखंडेंचा प्रचार, मोदींच्या योजना सांगण्यावर भर
    मराठा आरक्षणाचा मुद्दा ठरणार निर्णायक
    अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर करण्यात आलेल्या लाठीमारानंतर मराठा समाज भाजपवर नाराज आहे. त्यात छत्रपती संभाजीनगरमधून ओबीसी असलेले भागवत कराड हे इच्छुक आहेत. त्यामुळे भागवत कराड आणि अतुल सावे यांना मराठा समाज पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मराठा समाजाचा चेहरा देऊन छत्रपती संभाजीनगरची जागा आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू आहे.

    लोकसभेत शिवसेना भाजपसाठी लढते, पण विधानसभेत घात होतो; स्मिता वाघ यांना उमेदवारी, शिवसेना जिल्हाप्रमुख नाराज

    मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील हे शिवसेनेकडून इच्छुक आहेत. त्यामुळे विनोद पाटील यांना उमेदवारी देऊन मराठा समाजाची वोट बँक आपल्याकडे वळवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात अंतिम चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *