• Sat. Sep 21st, 2024
राम सातपुते आणि प्रणिती शिंदेंमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला, वाचा नेमकं काय घडलं?

सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात प्रचारातून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. निवडणुकीच्या रिंगणात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे एकमेकांना भिडले आहेत. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी थेट सुशीलकुमार शिंदेना टार्गेट केले आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या संपत्तीची चौकशी करा, अशी मागणी राम सातपुते यांनी केली आहे.
माढ्याचा तिढा कायम; देवगिरी आणि सागर बंगल्यावर खलबतं, भाजप मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत
यावर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी कडक शब्दांत उत्तर देत, मी उमेदवार आहे. माझ्याशी भिडा अशा भाषेत भाषण करताना राम सातपुते यांना उत्तर दिले आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी मी बोलणारच कारण सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना सोलापूरच्या विकासासाठी काय केलं, असा सवाल उपस्थित केला आहे. काँग्रेसने घराणेशाही केली आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन बालपण गेलेल्या उमेदवाराला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. गरीब घरातील उमेदवार काँग्रेसकडे नव्हते का, असं राम सातपुते यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना माहिती दिली आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार राम सातपुते हे गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या कार्यालयात जाऊन महायुतीची बैठक घेतली. भाषण करताना आणि माध्यमांना माहिती देताना राम सातपुते यांनी माहिती दिली. विजय शिवतारे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत वाद टोकापर्यंत गेला होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना भेटून हा वाद संपुष्टात आणला. अमरावतीत नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने घटकपक्ष बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद लवकरच संपुष्टात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

अजित दादांच्या आदेशाचं पालन करणार, सुनील शेळकेंकडून यूटर्न घेण्याची तयारी

सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते हे प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांवर सडकून टीका करत आहेत. राम सातपुते यांच्या टिकेने काँग्रेसच्या गोटात संतापाचे वातावरण पसरले आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या संपत्तीची चौकशी करा, सोन्याचा चमचा, घराणेशाही, उपरे अशा शब्दांत राम सातपुते काँग्रेसचे प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यावर तुटून पडत आहेत. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी देखील प्रतिउत्तर देत मी उमेदवार आहे. माझ्याशी भीड, माझ्या वडिलांना का बोलताय? अशा शब्दांत पलटवार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed