आवाडे यांचा ताराराणी पक्ष हा भाजपचा मित्रपक्ष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपला बाहेरून पाठिंबा देतात. परंतु यंदाच्या लोकसभा उमेदवारीच्या चर्चेत विचारात घेतलं नाही किंबहुना सहभागी करून घेतलं नाही, अशी तीव्र नाराज व्यक्त करून स्वतंत्र निर्णय घेतल्याचे आवाडे यांनी सांगितले. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाला देखील ताकदवान उमेदवार नसल्याने राहुल आवाडे यांच्या रूपाने ठाकरेंना मोठी ताकद या मतदारसंघात मिळू शकते. मात्र राहुल आवाडे निवडणूक रिंगणात उतरले तर राजू शेट्टी आणि त्या धैर्यशील माने यांची मात्र डोकेदुखी वाढणार आहे.
.
हातकणंगले मतदारसंघात आवाडे यांची मोठी ताकद आहे. तसेच महाविकास आघाडीचेही तीन आमदार हातकणंगले मतदारसंघात आहेत.इस्लामपूर, शिराळा तसेच हातकणंगलेमधून आवाडे यांच्यामागे ताकद उभी राहिल.
तिरंगी लढत, कोण कुणाचा गेम करणार?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीसोबत होती. तेव्हा राजू शेट्टी यांची हॅट्ट्रिक वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे हुकली. वंचितच्या मतविभागणीमुळे धैर्यशील माने खासदार झाले. आताही आवाडे यांच्या उमेदवारीमुळे तीच वेळ येणार की आवाडेंमुळे मानेंना फटका बसून शेट्टी खासदार होणार? याकडे हातकणंगलेसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेय.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची रचना कशी?
कोल्हापूर जिल्हा
शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ (विनय कोरे-जनसुराज्य)
हातकणंगले विधानसभा मतदारसंघ (राजू आवळे- काँग्रेस)
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ (प्रकाश आवाडे- ताराराणी)
शिरोळ विधानसभा मतदारसंघ (राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष आमदार, शिंदे गटाला पाठिंबा)
सांगली जिल्हा
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ (जयंत पाटील, राष्ट्रवादी)
शिराळा विधानसभा मतदारसंघ (मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी)
