• Mon. Nov 25th, 2024
    तुझ्या वडिलांनी विकास केला असता तर…; चंद्रकांत पाटलांनी रोहिणी खडसेंना सुनावलं

    जळगाव: आमदार चंद्रकांत पाटील खडसे परिवार यांच्यात सध्या वार प्रत्यारोप सुरू आहेत. यातच चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचे नाव न घेता तुझ्या वडिलांनी विकास केला असता, तर चंद्रकांत पाटलांना जनतेने निवडून दिले नसते, असं म्हणत त्यांनी थेट खडसे परिवाराला डिवचले आहे.

    आमदार चंद्रकांत पाटील बोलताना पुढे म्हणाले की माझ्या मतदारसंघात किती विकासकामे झाली हे मी दाखवून देऊ शकतो. सर्वसामान्य माणसांपर्यंत विकास हा झालेला आहे आणि खडसे अँड खडसे फॅमिलीवर काय बोलावे, मी न बोललेलं बरं, असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

    खडसे यांना रात्रंदिवस स्वप्न पडतात की मी ३० वर्षे झाली इतकी मोठे पदी भूषवली आणि जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरलेली आहे. आजही मुक्ताईनगर मतदारसंघात मूलभूत सुविधा नाहीये. मुक्ताईनगरमध्ये विकास होऊ शकला नाही तो आता या पाच वर्षाच्या काळात होत असल्याने खडसे चिंतेत असल्याचे त्यांनी सांगितले. इतकी मोठी पदं ३० वर्षापासून त्यांच्या घरात आहेत. मुक्ताईनगरचा विकास पूर्ण झालेला नाहीये. एकही मोठा उद्योग तथा सिंचनाचे प्रकल्प या मतदारसंघात आणू शकले नाही ते, या पाच वर्षांमध्ये मी सिंचन प्रकल्प मार्गी लावतो आहे.
    हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला विरोध, नाशिक लोकसभेसाठी कोणाची लॉटरी लागणार? महायुतीत रस्सीखेच
    ३० वर्षात मुक्ताईनगर पुढे गेले पाहिजे होते. फक्त मोठी पदं घरात घ्यायची पदं मिळाल्यानंतर नंदनवन हरितक्रांती केली नुसत्या चर्चा केल्या. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हे शहर पूर्ण आणि तापी नदीच्या काठावर वसलेले आहे. अजून ५०% भाग सिंचनापासून वंचित राहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात २२०० ते २६०० कोटींची सुप्रमा मंजुरी केली, यांच्या काळात एकही सुप्रमा मिळाली नाही. सिंचन प्रकल्प मार्गी लागला नाही. पूर्णपणे सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत, ते आता मार्गी लागत आहे.

    हे फक्त स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी व फायद्यासाठी त्यांचे हे सुरू आहे. विकासावर ते काय उत्तर देऊ शकतील हे फक्त कुटुंबामध्ये त्यांच्या चाललेले आहे. कुटुंबातल्या कुटुंबात प्रश्न उत्तर देणे सुरू आहे आणि ते काय सांगतील की माझ्या वडिलांनी हे केलं. तुझ्या वडिलांनी केले असते तर चंद्रकांत पाटलांना जनतेने निवडून दिले नसते, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचे नाव न घेता केला.

    रोहिणी खडसे तडकाफडकी शरद पवारांच्या भेटीला, रक्षा खडसेंविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता

    येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकास पर्व अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्ण तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील यात शंका नाही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास पर्व नक्कीच या भारतात व राज्यात आणल्याशिवाय राहणार नाही अशी त्यांनी अशा व्यक्त केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *