• Mon. Nov 25th, 2024

    सिंहास्थाच्या कामांसाठी महापालिका सल्लागार सर्वेक्षक नेमणार, नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

    सिंहास्थाच्या कामांसाठी महापालिका सल्लागार सर्वेक्षक नेमणार, नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : आगामी सिंहस्थासाठी महापालिकेने सल्लागार सर्वेक्षक नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरातील ३५० किलोमीटर लांबीचे रस्ते, तपोवनातील ७०० एकरवर साधुग्राम विकास, अंतर्गत व बाह्य वाहनतळ, मलनिस्सारण केंद्रे, जलशुद्धिकरण केंद्रे, रुग्णालये, आदींचे सर्वेक्षण करून सिंहस्थाच्या कामांचे सविस्तर प्राकलन तयार करण्याचे काम सल्लागार सर्वेक्षक करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिक दौऱ्यात महापालिकेला सिंहस्थ संदर्भातील आराखडा तयार करण्यासह पायाभूत सुविधांबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.

    नाशिकमध्ये सन २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ मेळ्यासाठी साधू-महंत व भाविकांना सेवा-सुविधा पुरविण्याची जबाबदारी नाशिक महापालिकेवर आहे. यासाठी महापालिकेने सुमारे ११ हजार १५८ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या सिंहस्थ नियोजन समितीच्या बैठकीत सादर केला. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वैद्यकीय, घनकचरा व्यवस्थापन, विद्युत, उद्यान आदी विभागांशी संबंधित विविध विकासकामे उभारली जाणार आहेत. यामध्ये साधुग्रामचे सर्वेक्षण, लेआऊट तयार करणे, डिमार्केशन करणे, अंतर्गत व बाह्य वाहनतळांचे सर्वेक्षण करून लेआऊट तयार करणे, विविध आरक्षित जागा, तात्पुरते अधिग्रहण करावयाच्या जागांचे सर्वेक्षण, वाहतूक सर्वेक्षण करून सिंहस्थ कामांचे सविस्तर प्राकलन तयार केले जाणार आहे. निविदा प्रक्रियेद्वारे सल्लागार सर्वेक्षक अंतिम केला जाणार आहे.
    वीजपुरवठ्याला बळकटी; वसई- विरार विभागामध्ये कोट्यवधींच्या कामांना गती, कोणत्या सुविधा मिळणार?
    या कामांचे होणार सर्वेक्षण

    – शहरातील ३५० किलोमीटर लांबीचे रस्ते
    – तपोवनात साधुग्रामसाठी ७०० एकर जागा
    – अंतर्गत व बाह्य वाहनतळांचा विकास
    – शहरात येणाऱ्या वाहनांच्या संख्येनुसार रस्त्यांचे नियोजन
    – मलनिस्सारण केंद्र, जलशुद्धिकरण केंद्र, रुग्णालये, पोलिस ठाणे, मंदिरे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed